(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Volkswagen Monsoon Service : Volkswagen India ने सुरू केली मान्सून सेवा मोहीम; ग्राहकांना मिळणार 'या' सुविधा
Volkswagen India : फॉक्सवॅगन इंडिया सध्या देशात Tigun, Vertus आणि Tiguan सारख्या कारची विक्री करते.
Volkswagen India : फोक्सवॅगन इंडिया (Volkswagen India) ही भारतातील कारनिर्माता कंपनी आहे. नुकतीच फोक्सवॅगन इंडियाने भारतातील 120 सेवा टचपॉइंट्सवरील ग्राहकांसाठी 'वार्षिक पावसाळी मोहीम' (Monsoon Service Campaign) कार देखभाल सेवा उपक्रमाची घोषणा केली आहे. ही मोहीम 1 जुलैपासून सुरू झाली असून महिनाभर चालणार आहे. कंपनी आपल्या लॉयल्टी उत्पादनांवर आकर्षक ऑफर देखील देईल, ज्यात विस्तारित वॉरंटी, सेवा मूल्य पॅकेज आणि इतर सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
पावसाळ्यात कार कंपन्यांकडून सवलतींसह अनेक वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्यात फोक्सवॅगन इंडियाच्या (Volkswagen India) नवीन नावाचा समावेश आहे. जे आपल्या ग्राहकांसाठी देशातील 120 सेवा टचपॉईंट्सवर वार्षिक मान्सून मोहीम चालवत आहे. Volkswagen India ने कार सेवेची घोषणा केली आहे. तुमच्याकडेही फॉक्सवॅगन कार असल्यास, या सर्व्हिस कॅम्पची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
फोक्सवॅगन इंडिया मान्सून मोहीम काय आहे?
फोक्सवॅगन मान्सून मोहिमेअंतर्गत, कंपनीचे ग्राहक त्यांच्या वाहनासाठी 40-पॉइंट तपासणीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये प्रशिक्षित व्यावसायिक त्यांच्या वाहनावर उपचार करतील. कोणताही संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम खूप फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये, सध्याच्या किंवा संभाव्य देखभाल आणि दुरुस्ती सेवांसाठी वाहनांची तपासणी केली जाईल. कंपनी ग्राहकांना फोक्सवॅगन असिस्टन्स आणि मोबाईल सर्व्हिस युनिटसह घरोघरी सेवा देखील देईल.
कंपनीने काय म्हटले?
कंपनीच्या या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना, आशिष गुप्ता, पॅसेंजर कार्स इंडिया, फॉक्सवॅगनचे ब्रँड संचालक म्हणाले, “एक जबाबदार ब्रँड म्हणून, आमच्या ग्राहकांना सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायक ड्रायव्हिंगचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरामदायी आणि सुलभ सेवा, तणावमुक्त ग्राहक सेवा हा आमच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे." ते पुढे म्हणाले की, "पावसाळी मोहिमेद्वारे, आम्ही मान्सूनपूर्व देखभालीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कंपनी Tigun आणि Vertus ची विक्री करते
फॉक्सवॅगन इंडिया सध्या देशात Tigun, Vertus आणि Tiguan सारख्या कारची विक्री करते. दोन्ही सुरुवातीच्या कारमध्ये समान 1.0L टर्बो पेट्रोल TSI आणि 1.5L TSI पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहे. या कार ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह येतात.
महत्त्वाच्या बातम्या :