Tata Motors : प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी टाटा मोटर्सची विकी कौशलसोबत भागीदारी
Vicky Kaushal Tata Motors Brand Ambassador : 'टेक दि कर्व्ह' मोहिमेसह टाटा मोटर्स आणि अभिनेता विकी कौशल यांच्या भागिदारीची सुरुवात होत आहे .

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादकाने आपल्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीसाठी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसोबत भागीदारीची घोषणा केली. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका व परंपरांना छेद देण्याप्रति वचनबद्धता यांच्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विकीचा प्रवास टाटा मोटर्सच्या नावीन्यपूर्णता, सर्वोत्तमता आणि प्रगती या मूल्यांशी जुळणारा आहे.
विकीचा आपल्या चिकाटी, प्रामाणिकपणा आणि आव्हानात्मक भूमिका घेण्याची तयारी यामुळे प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे- त्याचे हे गुण टाटा मोटर्सच्या भविष्यातील गतीला आकार देण्याच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळतात. टाटा मोटर्स ऑटोमोटिव्ह आपल्या डिझाइन, कामगिरी आणि तंत्रज्ञानाच्या सीमा पार करत असताना विकीसोबतची भागीदारी त्यांच्या प्रवासाला एक वेगळा आयाम देते. अगदी सामान्य घरातला एक मुलगा बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक बनतो. हा विकीचा प्रवास टाटा मोटर्सच्या प्रगती आणि नावीन्यपूर्णतेच्या वृत्तीचे प्रतिबिंब आहे. नवनवीन औद्योगिक मानके स्थापित करून टाटा मोटर्स आणि जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचे प्रदर्शन करून विकी जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावत आहेत.
विकी अनेक ब्रँड उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असून या सहयोगाची सुरुवात या आयपीएल हंगामात नवीन टाटा कर्व्हच्या जाहिरातीने होईल. 'टेक द कर्व्ह' असे शीर्षक असलेली ही जाहिरात मोहीम कर्व्ह ही फक्त एक कार नाही तर ती धाडस, आत्मविश्वास आणि आपल्या मनाचे ऐकणे या गोष्टींचे प्रतीक असल्याचे सांगते. आयुष्यात येणारे बदल स्वीकारणे महत्त्वाचे असल्याचे सांगते. भविष्याधारित, वैशिष्ट्यपूर्ण मेसेजिंगचे वर्चस्व असलेल्या बाजारपेठेत इतर लोक सरळ जात असताना आपण वेगळे वळण घेणे महत्त्वाचे ठरते.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री विवेक श्रीवत्स म्हणाले, “टाटा मोटर्समध्ये आम्ही सातत्याने उत्कृष्टतेची नवनवीन मानके स्थापित करत आहोत. प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात परिवर्तन घडवताना आम्हाला विकी कौशलचे स्वागत करताना अभिमान वाटतो, त्यांची मूल्ये आमच्याशी सुसंगत आहेत- प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन. विकी आणि टाटा मोटर्स या दोघांनाही भारताचा अत्यंत अभिमान आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स 'मेक इन इंडिया' उपक्रमासाठी वचनबद्ध आहे. ती भारतीय ग्राहकांसाठी जागतिक दर्जाची वाहने डिझाइन आणि तयार करते. तसेच विकी कौशल जागतिक स्तरावर भारतीय सिनेमा आणि संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतात. आमच्या ब्रँडच्या केंद्रस्थानी असलेली 'टेक द कर्व्ह' मोहीम आपला मार्ग निवडणाऱ्या व्यक्तींचा गौरव करते. ही भागीदारी आमच्या ग्राहकांना आणि त्याच्या चाहत्यांना आवडेल, अशी खात्री आहे.”
टाटा मोटर्स कुटुंबाचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विकी कौशल म्हणाले, "भारताच्या प्रवासाची व्याख्या नव्याने करणाऱ्या आपल्या ब्रँड टाटा मोटर्ससोबत कारच्या जगात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे. टाटा मोटर्सचा वारसा, नवसंशोधनाप्रति त्यांची वचनबद्धता तसेच परिपूर्णता या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या आहेत. त्यामुळे ही भागीदारी उत्तमच ठरेल. 'टेक द कर्व्ह' मोहीम या सहकार्यासाठी परिपूर्ण व्यासपीठ आहे. ती आपल्या मनाचे ऐकून अनवट मार्गांवरून आणखी मजबूत होऊन अडथळे दूर करण्याच्या भावनेला मूर्त रूप देते. मी टाटा मोटर्स कुटुंबासोबत प्रकल्पांमध्ये सहयोग करण्यास आणि आमची कहाणी जगाला सांगण्यास उत्सुक आहे."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

