(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Upcoming Honda Bike : होंडाची नवीन बाईक Hero Splendor ला देणार टक्कर, 15 मार्चला होतेय लॉन्च
Honda Bike : आपल्या दुचाकीसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी होंडा लवकरच भारतात आपली एक जबरदस्त बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने ही बाईक (Upcoming Honda Bike) 15 मार्चला लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे.
Honda Bike New Bike : दुचाकीसाठी प्रसिद्ध असलेली होंडा कंपनी लवकरच भारतात आपली आणखी एक जबरदस्त बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने ही बाईक (Upcoming Honda Bike) 15 मार्चला लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. होंडाची ही बाईक 100 सीसीची असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या बाईकची भारतीय वाहन बाजारात हिरो स्प्लेंडरशी स्पर्धा होणार आहे. होंडा आपल्या या बाईकमध्ये कोणते नवीन फीचर्स देऊ शकते, याची किंमत किती असू शकते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊत...
Upcoming Honda Bike : कसं असेल इंजिन?
15 मार्चला लॉन्च होणार्या बाईकबद्दल होंडाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ही बाईक 100 सीसी इंजिनसह सादर केली जाईल, जी 8bhp आणि 8NM पॉवर देईल. ज्याचे मायलेज 60 ते 70 km/l असू शकते. होंडा या बाईकची किंमत जवळपास 65,000 रुपये ठेवू शकते.
Upcoming Honda Bike: होंडा या बाईकचीही करते विक्री
होंडा सध्या देशांतर्गत बाजारात आठ बाईकची विक्री करते. ज्यात Honda CD110 Livo, Shine, SP125, Unicorn, X Blade CB200X आणि Hornet या बाईकचा समावेश आहे.
Aa rahi hai Honda ki Sau, ye zyada chalegi, aur zyada tikegi! Get ready to bring home the trust of Honda. Stay tuned!
— Honda 2 Wheelers (@honda2wheelerin) February 27, 2023
For more information, please give us a missed call on +919311340947 or visit our website.#Honda #PowerOfDreams pic.twitter.com/vvmZoCF5xM
Upcoming Honda Bike: या बाईकशी होणार स्पर्धा
होंडाची ही नवीन 100 बाईक बाजारात 100 सीसी सेगमेंटच्या बाईक्सला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामध्ये Hero च्या 100 cc Splendor तसेच Hero HF Deluxe, Bajaj Platina 100 सारख्या बाईक्स आहेत.
टू-व्हीलर सेगमेंटला भारतात मोठी मागणी
भारतातील टू-व्हीलर सेगमेंटला नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामध्ये जर आपण बाईकबद्दल बोललो तर Hero's Splendor बाईक बर्याच काळापासून सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. तसेच स्कूटर रेंज देखील सतत वाढत आहे. ज्यामध्ये Honda Activa ही स्कूटर सर्वाधिक पसंतीची स्कूटर राहिली आहे. मात्र आता पेट्रोल टू व्हीलरच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकीही बाजारात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत.
ऑटो संदर्भातील बातमी वाचाच :
Upcoming Hyundai SUV: Hyundai ची micro SUV देणार Tata Punch ला टक्कर, जाणून घ्या कधी होणार लॉन्च