(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Toyota Innova Crysta : नवीन Inova Crysta चे बुकिंग सुरु; Toyota चा जबरदस्त फर्स्ट लूक सादर
New Generation Innova Crysta : 2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे इंजिनदेखील पॉवरफुल असेल. या MPV चे अपडेटेड मॉडेल G, GX, VX आणि ZX या चार ट्रिममध्ये आणले जाईल.
New Generation Innova Crysta : जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात आपली अपडेटेड इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) एमपीव्ही लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने या कारसाठी बुकिंग देखील सुरू केलं आहे. या बुकिंगसाठी ग्राहक 50,000 रुपये टोकन रक्कम भरून कार बुक करू शकतात. कंपनीने नवीन 2023 Toyota Innova Crysta चे पहिले ऑफिशियल फोटोदेखील सादर केला आहे. या फोटोमधून कारचा फ्रंट लूक समोर येतोय. या कारचे वैशिष्ट्य नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझाइन
या MPV च्या फेसलिफ्टेड व्हर्जनला क्रोम आऊटलाइनसह रीडिझाइन केलेली ग्रिल देण्यात आली आहे. हेडलॅम्प क्लस्टर समान ठेवताना, क्रोमसह नवीन फॉग लॅम्प असेंबली मिळते. समोरील बंपरचा खालचा भागही बदलण्यात आला आहे. ही कार सिल्व्हर, व्हाइट पर्ल क्रिस्टल, अॅटिट्यूड ब्लॅक, सुपरव्हाइट आणि अवंत ग्रेड ब्रॉन्झ या पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे.
2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल इंजिन
2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे इंजिनदेखील पॉवरफुल असेल. या MPV चे अपडेटेड मॉडेल G, GX, VX आणि ZX या चार ट्रिममध्ये आणले जाईल. यात 2.4L डिझेल इंजिन मिळेल. जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडले जाईल. हे इंजिन 148bhp पॉवर आणि 343 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात कोणतेही पेट्रोल इंजिन किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार नाही. ZX प्रकार फक्त 7-सीट कॉन्फिगरेशनसह येईल. मात्र, इतर ट्रिम्सना 7 आणि 8 सीट्स लेआउटचा पर्याय मिळेल.
2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा वैशिष्ट्ये
नवीन इनोव्हा क्रिस्टा फेसलिफ्टमध्ये स्मार्ट प्लेकास्ट 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि Android ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करणारी TFT MID वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. यासोबतच स्मार्ट एंट्री सिस्टीम, सीट बॅक टेबल, 8-वे पॉवर अॅडजस्ट ड्रायव्हर सीट, लेदर सीट, डिजिटल डिस्प्लेसह मागील ऑटो एसी, वन टच टंबल सेकंड रो सीट्स आणि सभोवतालची रोषणाई प्रदान केली जाईल. सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून, या कारमध्ये 7 एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि वाहन स्थिरता नियंत्रण प्रणाली मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :