(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata CNG Car : टाटा मोटर्सकडून Tiago NRG iCNG चा टीझर रिलीज; मारुतीच्या Wagon R CNG बरोबर करणार स्पर्धा
Tata CNG Car : दिग्गज स्वदेशी ऑटोमेकर कंपनी टाटाने आपल्या Tiago NRG i CNG चा टीझर रिलीज केला आहे.
Tata CNG Car : टाटा मोटर्सने त्यांच्या एन्ट्री-लेव्हल हॅचबॅक कार टियागोच्या सीएनजी व्हर्जनचा टीझर सादर केला आहे. पुढील महिन्यात ही कार देशात लॉन्च होऊ शकते. NRG ही Tiago ची स्पोर्ट्स व्हर्जन आहे. ही कार भारतात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असेल. या कारचे वैशिष्ट्य नेमके काय आहे ते पाहा.
Tata Tiago NRG iCNG चा लूक कसा आहे?
टाटा टियागोच्या NRG iCNG आवृत्तीमध्ये ब्लॅक बी-पिलर, रॅप-अराउंड टेललॅम्प, फ्लेर्ड व्हील आर्च, रुंद एअर व्हेंट्स, 15-इंच अलॉय व्हील, स्कल्प्टेड हूड, सिल्व्हर स्किड प्लेट्स, इंडिकेटर-माउंटेड ORVM, छतावर साइड रेल आहेत. क्रोम ग्रिल, स्वेप्ट-बॅक हेडलाइट्स आणि मागील विंडो वायपर सारखी वैशिष्ट्ये दिसतील. या कारमध्ये 181mm चा ग्राउंड क्लीयरन्स उपलब्ध आहे. या कारचा व्हीलबेस 2,400mm असेल.
इंजिन कसे असेल?
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा टियागोच्या NRG iCNG आवृत्तीमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन सीएनजी मोडवर 72 एचपी पॉवर आणि 95 एनएम पीक टॉर्क निर्माण करेल. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. या कारमध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह सिस्टिम उपलब्ध असेल. ही कार सीएनजीवर 25 किमी/किलो मायलेज देईल.
हे फिचर्स असतील
सेंटर कन्सोल आणि एसी व्हेंट्सचे अपडेट या कारच्या केबिनमध्ये वैशिष्ट्ये म्हणून पाहिले जातील. तसेच, त्यात आणखी जागा मिळण्याची शक्यता आहे. नवीन Tiago NRG च्या CNG व्हर्जनमध्ये फॅब्रिक अपहोल्स्ट्री आणि मल्टी-फंक्शन पॉवर स्टीयरिंग व्हील दिले जातील. यात ब्लूटूथ, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले तसेच व्हॉईस कमांड फीचरसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमही मिळेल.
खर्च किती असेल?
सध्या टाटा मोटर्सने Tiago NRG च्या iCNG व्हर्जनची किंमत आणि डिलिव्हरी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, या कारची किंमत 7.5 लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या कारशी स्पर्धा करेल
मारुती सुझुकीची वॅगन आर ही भारतीय बाजारपेठेत त्याच सेगमेंटमध्ये टाटा टियागो एनआरजी आयसीएनजीशी स्पर्धा करते. ज्याची किंमतही जवळपास या एवढी आहे. Wagon R ला CNG किटसह 1-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे पेट्रोलवर 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते, तर CNG वर 57 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे. ही कार CNG वर 34.5 किमी/किलो मायलेज देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.42 लाख ते 6.86 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
महत्वाच्या बातम्या :
E-Motorad ने लॉन्च केली नवीन फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स