Top Selling Car: 'या' भारतातील टॉप 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV आणि हॅचबॅक कार, पाहा संपूर्ण लिस्ट
Car Sales Report: 2023 च्या सुरुवातीच्या महिन्याने भारतातील वाहन सेगमेंटमध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे. FADA च्या प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीसाठी जानेवारी 2023 ची आकडेवारी जाहीर झाली आहे.
Car Sales Report: नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीच्या महिन्याने भारतातील प्रवासी वाहन सेगमेंटमध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे. FADA च्या प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीसाठी जानेवारी 2023 ची आकडेवारी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये वाहनांची विक्री वार्षिक (वर्ष-दर-वर्ष) आधारावर 22 टक्क्यांनी वाढून 3.40 लाख युनिट झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये हा आकडा 2.79 लाख युनिट होता. या कालावधीत मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्सने देशात अनुक्रमे 1.50 लाख युनिट्स, 45,799 युनिट्स आणि 45,061 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. मारुती सुझुकीचा 44.10% मार्केट शेअर आहे, तर Hyundai कडे 13.46% आणि Tata Motors कडे 13.24% मार्केट शेअर आहे. आज आम्ही तुम्हाला जानेवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या 3 SUV आणि हॅचबॅक कारच्या आकड्यांबद्दल सांगणार आहोत.
Car Sales Report: नेक्सन ठरली मार्केट किंग
टाटाच्या (Tata) सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट कार नेक्सनने जानेवारी 2023 मध्ये 15,567 युनिट्स विकल्या, तर जानेवारी 2022 मध्ये कंपनीने या कारच्या 13,816 युनिट्सची विक्री केली. कारने 12.67 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. अलीकडेच कंपनीने या कारची किंमत 5,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे, त्यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत आता 7.80 लाख रुपयांवरून 14.30 लाख रुपये झाली आहे. असं असलं तरी याच्या विक्रीत सतत वाढ हॉट असल्याचं पाहायला मिळत आहे. ग्राहक या कारला खूप पंसती दर्शवत आहेत.
Car Sales Report: क्रेटाला दुसऱ्या क्रमांकावर
जानेवारी 2023 मध्ये Hyundai ने आपल्या Creta SUV च्या 15,037 युनिट्सची विक्री केली आहे. त्यामुळे सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत याला दुसरे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने या कारच्या 9,869 युनिट्सची विक्री केली होती. तर जानेवारी 2022 मध्ये 9,576 युनिट्सच्या तुलनेत 14,359 युनिट्सच्या विक्रीसह मारुती सुझुकी ब्रेझा तिसऱ्या स्थानावर आहे.
Car Sales Report: या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या हॅचबॅक कार
जानेवारी 2023 मध्ये मारुती सुझुकी अल्टो 21,411 युनिट्सची विक्री केली. जी गेल्या वर्षीच्या 12,342 युनिट्सच्या तुलनेत 73.48% जास्त आहे. सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत Alto 800 साठी 3.54 लाख ते 5.13 लाख रुपये आणि Alto K10 ची 3.99 लाख ते 5.95 लाख रुपये आहे. दुसऱ्या स्थानावर मारुती वॅगन-आर होती, ज्याने जानेवारी 2023 मध्ये 20,466 युनिट्सची विक्री केली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.65% अधिक आहे. तर मारुती स्विफ्ट तिसऱ्या स्थानावर आहे. ज्याने जानेवारी 2023 मध्ये 16,440 युनिट्सची विक्री केली. जानेवारी 2022 च्या तुलनेत या कारच्या विक्रीत 13.96% ची घट झाली आहे.