Road Safety: वाहनांशी संबंधित 'या' नियमात झाला मोठा बदल, जाणून घ्या
New Guideline for Tyre: केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2022 पासून बँक, पोस्ट आणि इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांप्रमाणेच वाहन क्षेत्रातील नियमातही मोठा बदल केला आहे. हे नवीन नियम वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या टायरशी संबंधित आहेत.
New Guideline for Tyre: केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2022 पासून बँक, पोस्ट आणि इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांप्रमाणेच वाहन क्षेत्रातील नियमातही मोठा बदल केला आहे. हे नवीन नियम वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या टायरशी संबंधित आहेत. त्यामुळे वाढत्या रस्ते अपघातांवर बऱ्याच अंशी आळा बसणार आहे. यासोबतच बॅटरीमुळे होणारे अपघात पाहता लवकरच इलेक्ट्रिक दुचाकींच्या बॅटरीसाठीही नवीन सुरक्षा मानके निश्चित करण्यात येणार आहेत.
काय आहे वाहनातील टायरचे नवीन नियम?
वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. 1 एप्रिल 2023 पासून विकल्या जाणार्या वाहनांना हे नवीन डिझाइन केलेले टायर्स बसवावेत, अशा सूचना केंद्र सरकारने वाहन उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत. या नवीन नियमांनुसार, सरकारने C1, C2 आणि C3 श्रेणीतील टायरसाठी AIS-142:2019 स्टेज 2 नियम अनिवार्य केले आहेत. AIS-142:2019 स्टेज 2 च्या नवीन नियमांतर्गत, त्यात रस्त्यांवरील टायर्सचे घर्षण, रस्त्यावरील टायर्सची सैल पकड आणि वाहन चालवताना टायर्सचा आवाज या नियमांचाही समावेश आहे. टायर्सना स्टार रेटिंग देऊन टायर्सची गुणवत्ता तपासण्याचे काम सरकार लवकरच सुरू करणार आहे.
दुचाकी बॅटरी सुरक्षा मानके
गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये ओला आणि ओकिनावा सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. स्कूटरमध्ये आग लागण्याचं महत्वाचं कारण याची बॅटरी असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमधील बॅटरीमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी परिवहन मंत्रालय मार्गदर्शक तत्त्वे आणण्याच्या तयारीत आहे. हे नियम आधी 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होते. मात्र सध्या यात काही शिथिलता देत केंद्र सरकारने ही मुदत 1 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. हे नियम दोन टप्प्यात लागू केले जातील. त्यातील पहिला टप्पा 1 डिसेंबर 2022 पासून आणि दुसरा टप्पा 1 मार्च 2023 पासून लागू केला जाईल. या नवीन नियमांतर्गत, अद्ययावत AIS 156 आणि AIS 038 Rev.2 मानके इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनिवार्य केली गेली आहेत. कारण यासाठी मसुदा अधिसूचना आधीच जारी करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार
Tata Tiago EV vs Tigor EV: टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या