Mercedes Benz EQS 580 : 'या' इलेक्ट्रिक कारने करा अयोध्या दर्शन; सिंगल चार्जवर 857 किमी प्रवास अन् बरेच Advance फिचर्स!
Mercedes Benz EQS 580 सिंगल चार्जमध्ये Mercedes Benz EQS 580 कार दिल्ली ते अयोध्येचे अंतर कापू शकणार आहे. त्यामुळे या लक्झरी कारने एका चार्जमध्ये दिल्लीहून अयोध्या गाठता येणार आहे.
Mercedes Benz EQS 580 : सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक (Electric Car) कारला पसंती दिली जात आहे. या इलेट्रिक कारमुळे अनेकांचा प्रवास लक्झरी होताना दिसत आहे. त्यातच आता देशात राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली असून राम मंदिर आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. दिल्ली ते अयोध्येचे अंतर 690 किमी आहे. सिंगल चार्जमध्ये Mercedes Benz EQS 580 (Mercedes-Benz) कार दिल्ली ते अयोध्येचे अंतर कापू शकणार आहे. त्यामुळे या लक्झरी कारने एका चार्जमध्ये दिल्लीहून अयोध्या गाठता येणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहून अनेकजण थेट अयोध्या गाठायचा प्लॅन करत आहेत. अयोध्येत काही दिवसात लाखो प्रवासी येणार आहेत. त्यात प्रदुषणाचीदेखील भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणं सगळ्यांसाठीच योग्य ठरणार आहे.
फुल चार्जवर 677 किमी प्रवास करणं शक्य
Mercedes Benz EQS 580ही मर्सिडीजची लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही कार सिंगल चार्जवर 857 किमीची रेंज देते. ही रेंज कंपनीने दावा केलेली रेंज आहे. मात्र, या कारच्या फुल चार्जवर तुम्ही 677 किमीची रेंज सहज पार करू शकता. या कारला युरो एनसीएपीकडून 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे. या कारमध्ये 9 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.
पुण्यात झाली कारची निर्मिती
कारमध्ये 107.8 किलोवॅट लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारच्या लाँचिंगप्रसंगी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, ही कार पुण्यात तयार होत आहे आणि ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. देशात काम करणाऱ्या अधिकाधिक कार उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पुढे यायला हवे, असंही गडकरी म्हणाले होते.
फॉग लाइट, 9 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा सारखे फिचर्स
या कारच्या इतर फिचर्स बोलायचे झाले तर या कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रति तास आहे. कारमध्ये देण्यात आलेल्या बॅटरी जास्तीत जास्त 750.97 बीएचपीची पॉवर जनरेट करतात. दिल्लीत या कारची एक्स शोरूम किंमत 1.62 कोटी रुपये आहे. ही कार मेड इन इंडिया 5 सीटर लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. या कारमधील वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर रियर व्ह्यू मिरर, फॉग लाइट, 9 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम असे अनेक फिचर्स आहेत.
मर्सिडीज-बेंझची भारतात तयार झालेली ही चौदावी कार आहे. याशिवाय भारतात मेबॅक आणि एस-क्लास लक्झरी लिमोझिन, जीएलएस, जीएलई आणि जीएलए एसयूव्ही, सी-, ई- आणि एस-क्लास सेडान आणि एएमजी आहेत. अशा गाड्याही तयार करण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Car Safety Features : कारमधील हे सेफ्टी फीचर्स आहेत मोठ्या कामाचे;असे करतात तुमचे संरक्षण