Electric Car : टाटा मोटर्सची 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; 28 सप्टेंबरला होणार लॉन्च
Tata Tiago Electric Car : टाटा टियागो (Tata Tiago) असून ही कार या 28 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे.
Tata Tiago Electric Car : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Car) मागणी वाढली आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार, बाईक, स्कूटर लॉन्च करत आहेत. अशातच एक अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे, टाटा कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे. या कारचं नाव टाटा टियागो (Tata Tiago) असून ही कार 28 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. तसेच, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टाटा टियागो ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे त्याचबरोबर पहिली मास-मार्केट EV हॅचबॅक असेल. नव्याने लॉन्च होणाऱ्या या कारमध्ये कोणते फिचर्स आहेत ते पाहा.
Tata Tiago Electric Car कारचे फिचर्स
टाटा मोटर्स आपल्या Tiago कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात उतरवणार आहे. टाटा टियागोचे काही फिचर्स हे साधारण टीगोर (Tigore) सारखेच आहेत. यामध्ये IP67 रेटिंगसह बॅटरी पॅक 26kWh असण्याची अपेक्षा आहे. हा एक आधुनिक बॅटरी पॅक आणि EV पॉवरट्रेन आहे. याचबरोबर Tigore सारखे वैशिष्ट्य असमाऱ्या या कारमध्ये आणखी फिचर्स जोडण्यात आले आहेत. हे फिचर्स लॉन्चिंगच्या वेळी कळतील.
Tata Tiago Electric Car ची बॅटरी कशी असेल?
Tata Tiago चा बॅटरी पॅक कसा असेल तसेच किती वेळात बॅटरी चार्ज होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही त्यामुळे हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, सध्या मिळालेल्या अपडेटनुसार, टाटा टियागो ही सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon) ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला भारताला जगातील इलेक्ट्रिक वाहन केंद्र बनवायचे आहे. कंपनीने सांगितले की, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने (TPEM) TPG Rise Climate च्या सहकार्याने एक नवीन मोबिलिटी सोल्यूशन सादर केले आहे. ग्रीन राईडला प्रोत्साहन देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच 2030 पर्यंत देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या 30 टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने असावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.