टाटा मोटर्स 1 जुलैपासून वाहनांच्या किमती वाढवणार, जाणून घ्या किती होणार वाढ
Tata Motors Commercial Vehicles Price Hike: टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनाच्या किमतीत वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे.
Tata Motors Commercial Vehicles Price Hike: टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनाच्या किमतीत वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनाच्या किमतीत 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे म्हटले आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी कंपनी ही किंमत वाढवत असल्याचं सांगण्यात येत आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही वाढ 1.5 ते 2.5 टक्क्यांच्या श्रेणीत असेल. ही वाढ भिन्न मॉडेल आणि व्हेरिएण्टनुसार 1 जुलै 2022 पासून संपूर्ण श्रेणीवर लागू होईल. स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर धातूंच्या किंमती, तसेच इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ होत आहे.
यापूर्वी एप्रिलमध्येही टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती 1.1 टक्क्यांनी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 - 2.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. वाढत्या इनपुट खर्चाची भरपाई करण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान टाटा मोटर्सची देशांतर्गत व्यावसायिक वाहनांची विक्री मे महिन्यात वाढून 31,414 युनिट्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 9,371 युनिट्स होती. तर मे महिन्यात याची एकूण विक्री जवळपास तिप्पट होऊन 76,210 युनिट्स झाली. मे 2021 मध्ये कोविड-19 मुळे कंपनीची एकूण विक्री 26,661 युनिट्स होती.
दरम्यान, कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या महिन्यात त्यांच्या Ace कॉम्पॅक्ट ट्रकचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च केला आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कार, युटिलिटी वाहने, पिक-अप, ट्रक आणि बसेसची एक आघाडीची जागतिक ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे.
महत्वाच्या बातम्या :