एक्स्प्लोर

Tata च्या गाड्या महागल्या, Nexon ते Safari इतक्या वाढल्या किंमती

Tata Motors Vehicle Price Increase: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे.

Tata Motors Vehicle Price Increase: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे आता ग्राहकांना टाटाची कार खरेदी करताना आधीपेक्षा जादा पैसे मोजावे लागणार आहे. कंपनीने सर्व व्हेरिएंट आणि मॉडेल्सच्या आधारे वाहनांच्या किमतीत 0.55 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे नवीन दर शनिवारपासून (9 जुलै) लागू झाले आहेत. टाटाने नेक्सॉन, पंच, सफारी, हॅरियर, टियागो, अल्ट्रोज आणि टिगोर सेडानच्या किमती आजपासून वाढवल्या आहेत.

वाहने बनवण्याचा खर्च वाढल्याने किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. कंपनीने एप्रिल 2022 मध्ये प्रवासी वाहनांच्या किमतीही सरासरी 1.1 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्याचप्रमाणे जानेवारी 2022 मध्ये कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती 0.9 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. शनिवारपासून वाढलेल्या किंमतीनंतर टाटाच्या नेक्सॉन, पंच, सफारी आणि टियागोसारख्या गाड्या महाग होणार आहेत.

सध्या बाजारात टाटा मोटर्सच्या गाडयांना चांगली मागणी आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या जागतिक घाऊक विक्रीत 48 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या कालावधीत एकूण 3,16,443 कारची विक्री केली आहे. यामध्ये 'जॅग्वार लँड रोव्हर' (JLR) च्या विक्रीच्या आकड्यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तिमाहीत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहनांची जागतिक विक्री 2,12,914 युनिट्सपर्यंत वाढली आहे. एका वर्षापूर्वी, आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीत 1,61,780 युनिट्सची विक्री झाली होती.

गेल्या महिन्यात सर्वाधिक पसंतीच्या कार ब्रँडच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून 2022 मध्ये टाटा कारच्या विक्रीत जून 2021 च्या तुलनेत 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटाने गेल्या महिन्यात 45,197 युनिट्स विकल्या, गेल्या वर्षी जून 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 24,110 युनिट्सच्या तुलनेत. कंपनीच्या Nexon ला सर्वाधिक ग्राहकांची पसंती मिळाली आणि 14,614 कारची विक्री झाली.

भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सने हॅचबॅक, एसयूव्ही आणि सेडान यांसारख्या अनेक सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च केली आहेत. कंपनीने आपले सर्वात लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल सफारी बाजारात एका नवीन स्वरूपात आणले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एंट्री-लेव्हल एसयूव्ही पंचच्या 10,414 युनिट्स आणि सफारीच्या 1,869 युनिट्सचीही विक्री केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget