एक्स्प्लोर

TATA Harrier ev : टाटा मोटर्सकडून हॅरियर इव्हीच्या किमतीची घोषणा, किती लाखात SUV खरेदी करता येणार? काय आहेत वैशिष्ट्ये

TATA Harrier ev : १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमी पर्यंत रेंज, जलद चार्जिंग स्पीड यासह अनेक वैशिष्ट्य असलेल्या टाटा हॅरियर एसयूव्हीचे वेगवेगळे व्हेरिएंट भारतीय मार्केटमध्ये आणण्यात आले आहेत.

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या चार-चाकी इव्ही उत्पादकाने स्वदेशी एसयूव्ही हॅरियर इव्हीच्या किमतींची घोषणा केली. एसयूव्ही हॅरियर इव्ही २१.४९ लाखांपासून सुरु होत असून ती २७.४९ लाख पर्यंत असणार आहे. २ जुलै पासून हॅरियर.इव्हीचे बुकिंग सुरू होत आहे.

रियर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) द्वारा संचालित प्रकारासाठीच्या प्रारंभिक किंमती २१.४९ लाखांपासून सुरु होत आहेत. हॅरियर इव्ही अॅडव्हेंचर ६५ची किंमत २१.४९ लाख रुपये, अॅडव्हेंचर एस ६५ ची किंमत २१.९९ लाख रुपये, फियरलेस+ ६५ ची किंमत २३.९९ लाख रुपये, फियरलेस+ ७५ ची किंमत २४.९९ लाख रुपये आणि एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख आहे.

केवळ या उद्योगातच नाही, तर जगात नवीन असलेली इनोव्हेशन्स आणि बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटीसह सुलभ मालकी प्रदान करण्याबाबतची कंपनीची वचनबद्धता दर्शविणाऱ्या हॅरियर इव्हीने केवळ आपली विश्वासार्हता मजबूत केलेली नाही, तर सुपर-कार सारखा परफॉर्मन्स, कुठेही घेऊन जाऊ शकणारी ऑफ-रोड क्षमता, आकर्षक टेक्नॉलॉजी आणि आलिशान आरामदायकता प्रदर्शित करून भविष्याची अल्टीमेट एसयूव्ही म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे.

हॅरियर इव्हीच्या स्पर्धात्मक किमती ठेवण्याच्या धोरणाविषयी टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवास्तव म्हणाले, "हॅरियर.इव्ही सह एका सुपरकार प्रमाणे बेजोड परफॉर्मन्स देण्याची, कुठेही ऑफ रोड जाण्याची, आलिशान आरामदायकता देण्याची एका एसयूव्हीची खरी क्षमता उघड करण्याची आमची इच्छा आहे. हॅरियर.इव्हीमध्ये लक्षणीय असे काय आहे, तर हे वाहन या सर्वच गोष्टी प्रदान करते आणि तेही आयसीई संचालित वाहनांच्या किंमतीत.आणि परफॉर्मन्स, कार्यक्षमता, टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा या बाबतीत मात्र हॅरियर.इव्ही आयसीई संचालित वाहनांना मागे टाकते." 

विवेक श्रीवास्तव पुढे म्हणाले की, "आज या वाहनाच्या किंमती जाहीर करताना आम्ही भारतात ई-मोबिलिटीला पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलत आहोत आणि त्याचबरोबर पारंपरिक आयसीई संचालित वाहनांना एक दमदार पर्याय देऊ करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, हॅरियर.इव्ही एसयूव्ही या उद्योगात एसयूव्हीच्या नवीन युगाची सुरुवात करेल. या युगात वाहनाला शक्ती कुठून मिळते हे नाही, तर वाहन कशी शक्ती प्रदान करते हे महत्त्वाचे असेल.”

हॅरियर इव्हीची ठळक वैशिष्ट्ये:

  • सुपरकारसारखा परफॉर्मन्स
  • पुढच्या बाजूस १५८ पीएस (११६ केडब्ल्यू)ची ड्युअल मोटर शक्ती आणि मागील बाजूने २३८ पीएस (१७५ केडब्ल्यू)
  • ड्युअल मोटर सेटअपमधून ५०४ एनएम टॉर्क
  • ६.३ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास सेगमेन्ट मध्ये सर्वश्रेष्ठ
  • या एसयूव्हीसह कुठेही ऑफ-रोड जाण्याच्या क्षमतेचा आनंद अनुभवा
  • क्वॉड व्हील ड्राइव्ह सिस्टमसह अप्रतिम ऑफ-रोड अनुभव मिळवा
  • सहा टेरेन मोड असल्यावर काहीच अशक्य नाही, यामुळे कुठेही बिनधास्त जाण्याचा विश्वास मिळतो
  • ५४० अंश सराऊंड व्ह्यू सह आसपासचे आणि खालचे देखील बघू शकता
  • सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आरामदायकता
  • असामान्य हाताळणी आणि चालवण्याच्या कम्फर्टसाठी फ्रिक्वन्सी डिपेन्डन्ट डॅम्पिंगसह अल्ट्रा गाइड सस्पेंशनसह बेजोड आरामदायकता आणि शांती मिळवा
  • जगातील पहिली हरमनची ३६.९ सेमी (१४.५३”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जी सॅमसंग निओ क्यूएलईडीद्वारा संचालित आहे. हा जगातील पहिला निओ क्यूएलईडी ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे, यात JBL ऑडिओ मोड आणि डॉल्बी अॅटमॉस सह जेबीएल ब्लॅक १० स्पीकर सिस्टम आहे, जी थिएटरमॅक्स अनुभव देते.
  • ई-व्हॅले ऑटो पार्क असिस्ट, डिजी अॅक्सेस डिजिटल की आणि ड्राइव्हपे सह तुमच्या हातात सुविधेचे बळ
  • मालकीच्या मुक्त अनुभवासाठी बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे (*फक्त प्रथम मालक – खाजगी वैयक्तिक ग्राहकासाठीच)
  • ७५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकचे पाठबळ जे ६२७ किमीची एआरएआय प्रमाणित (पी१ + पी२) रेंज (अंदाजे ४८० किमी – ५०५ किमी सी७५ रेंज) देते
  • १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमी पर्यंत रेंज जोडून जलद चार्जिंग स्पीडचा लाभ मिळवा
  • हॅरियर.इव्ही केवळ आपल्या अत्याधुनिक क्षमता प्रदर्शित करत नाही, तर देशात बनणाऱ्या एसयूव्हीसाठी एक नवीन मापदंड स्थापित करते.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
Embed widget