Tata Discount Offers : 'या' टाटा कारवर मिळतेय भरघोस सूट; तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका
Discount Offers on Tata Cars : या सणासुदीच्या निमित्ताने टाटा कंपनी आपल्या कारवर भरघोस डिस्काउंट ऑफर देत आहे.
Discount Offers on Tata Cars : दिवाळीचा (Diwali 2022) सण सुरु झाला आहे. या दिवसांत बाजारात आपल्याला विविध वस्तूंवर ऑफर तर पाहायलाच मिळतात. पण त्याचबरोबर वाहन उत्पादक कंपन्या देखील यामागे कुठे मागे नाहीत. दिवाळीच्या निमित्ताने वाहन उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कारवर ऑफर घेऊन आल्या आहेत. यापैकी एक आहे भारतीय वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors). या सणासुदीच्या निमित्ताने टाटा कंपनी आपल्या कारवर भरघोस डिस्काउंट ऑफर देत आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट दिली जात आहे.
टाटा हॅरियर (TATA Harrier) आणि टाटा सफारी (Tata Safari) :
Tata Motors त्यांच्या Harrier आणि Safari वर एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट, रोख ऑफरच्या रूपात 65,000 रूपयांपर्यंत सूट देत आहे. या दोन्ही अतिशय प्रीमियम SUV कार आहेत. त्यामध्ये अनेक फीचर्सही देण्यात आले आहेत.
टाटा पंच (Tata Punch) आणि टाटा टियागो (Tata Tiago) :
ग्राहक रोख ऑफर, एक्सचेंज बोनस, टाटा पंच आणि टियागो हॅचबॅक कारच्या खरेदीवर कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात 43,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. टाटा पंच ही भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे. या घटकाला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळते.
टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigore EV) आणि सीएनजी (CNG) :
टाटाची ही सेडान कार इलेक्ट्रिक आणि सीएनजी अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या दोन्ही प्रकारांवर ग्राहक 43,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या ऑफर्समध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट, कॅश ऑफर यांचा समावेश आहे.
टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz) :
Tata Altroz ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट, कॅश ऑफरच्या रूपात 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. तसेच ही कार जास्त सुरक्षित मानली जाते.
महत्वाच्या बातम्या :