SUV TATA Punch EV : भारतातली सगळ्यात लहान इलेक्ट्रिक कार SUV TATA Punch EV चे फिचर्स समोर, एकदा चार्ज केली की 300 किमी धावणार; किंमत किती असणार?
सध्या सगळीकडेच EV कारची क्रेझ आहे. अनेकांना EV कार खरेदी करायची असते. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून अनेकांनी EV कारला पसंती दिली आहे. त्यातच आता टाटा मोटर्सने सगळ्यांना एक चांगलं ऑप्शन उपलब्ध करुन दिलं आहे.
SUV TATA Punch EV : सध्या सगळीकडेच EV कारची क्रेझ (Auto News) आहे. अनेकांना EV कार खरेदी करायची असते. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून अनेकांनी EV कारला पसंती दिली आहे. त्यातच आता टाटा मोटर्सने सगळ्यांना एक चांगलं ऑप्शन उपलब्ध करुन दिलं आहे. टाटा मोटर्सने दिनांक 5 जानेवारीला शुक्रवारी त्यांची टाटा पंच EV समोर आणली आहे. ही कार पूर्ण चार्जिंग केल्यावर 300 ते 400 किलोमीटर पर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. टाटा मोटार्सने आणलेल्या या पंच EV गाडीची बुकिंगही सुरू झालेली आहे.
21 हजार रुपये टोकन देऊन तुम्ही ही गाडी बुक करू शकता. अशातच सिट्रोएन eC3 ही गाडी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे आता टाटा पंच EV आणि सिट्रोएन eC3 दोन गाड्यांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे. यांना नेक्सॉन EV आणि टियागो EV यांच्यामधली पोझिशन देण्यात येईल. अर्थात याची किंमत 10 ते 13 लाख रुपये, एक्स-शोरूम याच्या मध्ये असू शकते.
या दोन व्हेरियंटमध्ये मिळेल टाटा पंच EV
टाटा पंच EV दोन व्हेरिएंटमध्ये तयार केली गेली आहे आणि ते दोन व्हेरिएंट म्हणजे स्टॅंडर्ड आणि लाँग रेंज. स्टॅंडर्ड मध्ये 25 kWh आणि लाँग रेंजमध्ये 35 kWh बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे. स्टॅंडर्डमध्ये फक्त 3.3kW AC चार्जर मिळेल आणि लाँग रेंजमध्ये 7.2kW AC चार्जर मिळणार आहे, सोबतच 150kW DX फास्ट चार्जिंग मिळणार आहे.
टाटा पंच EV : एक्सटीरियर डिजाईन
याच्या फ्रंटमध्ये फुल विड्थ LED लाईट बार आणि एक स्प्लिट हेडलॅम्प सेटअप देण्यात आला आहे. इथला मेन हेडलॅम्प नेक्सॉन EV सारखा आहेत. तसेच पंच EV ही कंपनीची पहिली कार आहे, ज्याच्या समोर चार्जिंग सॉकेट आहे. याच्या खाली पूर्णपणे नवीन डिझाइन केलेला बंपर आहे. मागील बाजूस Y-आकाराचा ब्रेक लाईट सेटअप, रूफ स्पॉयलर आणि ड्युअल-टोन बंपर डिझाइन आहे. सर्व चार चाकांवर डिस्क ब्रेकसह 16-इंच अलॉय व्हील्स उपलब्ध असतील. टाटाची ही पहिली ईव्ही आहे, ज्यात स्टोरेजसाठी बोनेटच्या खाली ट्रंक आहे.
टाटा पंच EV इंटीरियर फीचर्स
पंच EV च्या डॅशबोर्डची हायलाईट म्हणजे नवीन 10.25-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन. यात 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक मोठे टू-स्पोक स्टीयरिंग व्हील देखील आहे. खालच्या वेरिएंटमध्ये 7.0-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल क्लस्टर असेल. Nexon EV मध्ये असलेला रोटरी ड्राइव्ह सिलेक्टर फक्त लाँग रेंज व्हेरियंटमध्ये मिळू शकते.
इतर महत्वाची बातमी-