(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Upcoming Bike: स्मार्ट लूक आणि 200 कमी रेंज, नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'ही' इलेक्ट्रिक बाईक
Ultraviolette F77 Electric Bike: देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातच आता वाहन निर्माता अल्ट्राव्हायोलेट पुढील महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे.
Ultraviolette F77 Electric Bike: देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातच आता वाहन निर्माता अल्ट्राव्हायोलेट पुढील महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. अल्ट्राव्हायोलेटने अलीकडेच बंगलोरमध्ये आपली नवीन बाईक F77 ची टेस्टिंग सुरू केली आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक बेंगळुरूमध्ये आणणार आहे. यानंतर कंपनी अमेरिका आणि युरोपमध्येही ही बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
फीचर्स
अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक बाईकमध्ये रिमोट डायग्नोस्टिक्स, राइड डायग्नोस्टिक्स, मल्टिपल राइड मोड्स, अॅडजस्टेबल सस्पेंशन, ओव्हर-द-एअर (OTA) अपग्रेड, बाईकट्रॅकिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, ड्युअल-चॅनल ABS यासारखे फीचर्स आहेत. कंपनीने माहिती दिली आहे की, 190 देशांतील 70,000 हून अधिक लोकांनी आधीच याची प्री-बुकिंग केली आहे. F77 चे साइड पॅनेल्स फ्रेम आणि बॅटरी पॅक व्यवस्थित कव्हर करतात.
रेंज
अल्ट्राव्हायोलेट F77 एका चार्जवर 200 किमी पर्यंतची रेंज मिळवू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक फक्त 2.9 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग गाठू शकते. तसेच या इलेक्ट्रिक बाईकचा कमाल वेग 140 किमी प्रतितास असेल. अल्ट्राव्हायोलेटने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध भूभाग आणि हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी F77 ची टेस्ट घेण्यात आली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी आपली अपडेटेड Raider 125 बाईक 19 ऑक्टोबर रोजी नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. TVS नवीन Raider 125 MotoWars वर व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्च करणार आहे. जे स्मार्ट डिव्हाइसेसवर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता याचे प्रसारण सुरू होईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Diwali 2022: दिवाळीआधी टीव्हीएस करणार धमाका, नवीन अपडेटसह येत आहे TVS Raider 125