एक्स्प्लोर

Car Comparison : Tata Nexon EV फेसलिफ्ट की महिंद्रा XUV400? तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? जाणून घ्या

Car Comparison : Mahindra XUV400 सध्या 15.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

Tata Nexon EV Facelift vs Mahindra XUV 400 : दिग्गज कार कंपनी टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा या कार कंपन्या नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट घेऊन येत असतात. नुकतेच टाटा नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट वि महिंद्रा कारमध्ये अनेक बदल असूनही, ते बाजारात केवळ Mahindra XUV400 शी स्पर्धा करते. आज आम्ही तुम्हाला Tata Nexon EV आणि Mahindra XUV400 मधील तुलना सांगणार आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला असेल हे समजणे तुम्हाला सोपे जाईल. चला तर जाणून घेऊयात.

पावरट्रेन

Tata Nexon EV फेसलिफ्ट मॉडेल्स मिड रेंज (MR) आणि लाँग रेंज (LR) मध्ये उपलब्ध आहेत, ही मॉडेल्स अनुक्रमे 127 HP पॉवर आणि 143 HP पीक पॉवर जनरेट करतात. पण, दोन्ही मॉडेल्सना 215 Nm चे समान पीक टॉर्क आउटपुट मिळते. यात कायमस्वरूपी सिंक्रोनाइझ मॅग्नेट मोटर आहे. 

Mahindra XUV400 मध्ये स्थापित केलेली इलेक्ट्रिक मोटर 148 HP पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या पॉवरट्रेनच्या मदतीने, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ 8.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवण्यास सक्षम आहे.

बॅटरी पॅक आणि रेंज किती असेल?

Tata Nexon EV फेसलिफ्टच्या लाँग रेंज मॉडेलला 40.5 kWh बॅटरी पॅक मिळतो, ज्याचा एका चार्जवर 465 किमीचा रेंज असल्याचा दावा केला जातो. तर त्याच्या मिड-रेंज मॉडेलमध्ये 30 kWh बॅटरी पॅक आहे, ज्याचा दावा एका चार्जवर 325 किमी आहे. 

Mahindra XUV400 EL ला 39.4 kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो पूर्ण चार्ज केल्यावर 456 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. 

किंमत किती असेल?

Mahindra XUV400 सध्या 15.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे, तर त्याच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 19.39 लाख रुपये आहे. सध्याच्या Tata Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख ते 19.39 लाख रुपये आहे. सध्या, 2023 Nexon EV फेसलिफ्टच्या किमती उघड झालेल्या नाहीत. मात्र, त्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ अपेक्षित आहे.

तसे. पाहायला गेले तर टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा कार या दोन्ही कार आपापल्या जागी योग्य आहेत. ग्राहकांना जर या दोघांमधून तुमच्यासाठी बेस्ट कार खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. मात्र, सध्या टाटा नेक्सॉच्या किंमती बाजारात उघड झालेल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Tata Harrier Facelift : मोठ्या टचस्क्रीनसह दिसणार नवीन टाटा हॅरियर फेसलिफ्ट; इतर अनेक वैशिष्ट्यांसह अपडेटेड बदल दिसणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget