Review: एक चार्जमध्ये गाठते 500 किमीचा पल्ला; Kia EV6 बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
Kia EV 6 Review: किया आपली पहिलीच इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एक प्रीमियम क्रॉसओव्हर कार आहे. EV6 अगदी नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे.
Kia EV 6 Review: किया आपली पहिलीच इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एक प्रीमियम क्रॉसओव्हर कार आहे. EV6 अगदी नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे. या कारचे डिझाइन पुढील भविष्याला लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. यात ग्राहकांना एक मोठा व्हीलबेस मिळणार आहे. भारतीय बाजारपेठेत या कारच्या फक्त 100 युनिट्स विकल्या जाणार आहेत.
या कारचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात ही कार खूपच आकर्षक दिसत आहे. याचा आकारही मोठा असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. मात्र लो-स्लंगमुळे ही कार इतर कारच्या तुलनेत जरा वेगळी दिसते. यात मोठे 19 इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, EV6 जागतिक बाजारपेठेत अनेक बॅटरी पॅक आणि मोटर पर्यायांसह उपलब्ध आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, भारतात याचे 77.4 kWh आणि 58 kWh प्रकार आणले लॉन्च केले जातील, ज्यांना ऑल-व्हील-ड्राइव्ह आणि रीअर-व्हील-ड्राइव्ह मिळेल. मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार एका चार्जमध्ये 500 कमीची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
परफॉर्मन्स
Kia EV6 केवळ रेंजच नाही तर त्याच्या कार्यक्षमतेसाठीही बेंचमार्क सेट करेल. रियर-व्हील-ड्राइव्ह प्रकार 225 ब्रेक-हॉर्सपॉवर आणि 350Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. तर अधिक पॉवरफुल ऑल-व्हील-ड्राइव्ह प्रकारची मोटर 345Bhp आणि 605Nm पीक टॉर्क निर्माण करते. Kia EV6 चे ऑल-व्हील-ड्राइव्ह प्रकार 0 ते 100 किमीची गती 5.2 सेकंदात प्राप्त करते. तर गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Audi E-tron 55 ला 0 ते 100 किमीची गती प्राप्त करायला 6.5 सेकंदांचा वेळ लागतो.
सेफ्टी फीचर्स
Kia EV6 हे A-DAS फीचरसह सुसज्ज आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्हाला यात 8 एअरबॅग्ज, ABS, EBD, स्थिरता नियंत्रण आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. याशिवाय यात इंटेलिजेंट रीजनरेटिव्ह ब्रेकिंग फीचर देखील मिळणार आहे.
याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, 4.7 मीटर लांबीसह, Kia EV6 क्रॉसओवर डिझाइन थीमसह येते. यात LED लाईट्स आणि डिजिटल टायगर नोज ग्रिल सारखी फीचर्स देखील मिळणार आहे. लांब बोनेट आणि खिडकीच्या काचेच्या मोठ्या आकारामुळे Kia EV6 चा लूक अधिक आक्रमक दिसतो.
चार्जिंग
KIA Ev6 सुपरफास्ट चार्जिंगसह सुसंगत आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही Kia EV6 ला 350 kW DC चार्जरने 18 मिनिटांत 10-80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकता. मात्र 350 kW DC चार्जर भारतात उपलब्ध नाही. परंतु तुम्ही ही कार 50 kW चा चार्जरने चार्ज करू शकता, जे तुम्हाला 1 तास 13 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करण्यास मदत करेल. यासोबत मिळणाऱ्या मोफत AC वॉल बॉक्स चार्जरने ही कार 12 ते 14 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होईल.
Kia EV6 च्या आतील बाजूस ऑल-ब्लॅक थीम दिली आहे. याच्या सीट रिसायकल केलेल्या Wigan मटेरियलचा वापर करून बनवल्या आहेत. यात 12.3-इंचाची टचस्क्रीन मिळते, तर ड्रायव्हरचा डिस्प्ले देखील 12.3-इंचाचा आहे. याचे टू-स्पोक स्टीयरिंग देखील जबरदस्त आहे, जे तुम्ही किआ कारमध्ये यापूर्वी कधीही पाहिले नसेल. समोरच्या सीट्स इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला हिटिंग आणि कूलिंगची सुविधा मिळेल. केबिन 5 लोकांसाठी पुरेशी प्रशस्त आहे आणि सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम यात मिळेल.