Pakistan Automobile Industry: पाकिस्तानमध्ये वाहनांच्या किंमतीत प्रचंड वाढ, फॉर्च्युनर 1.7 कोटी रुपयांना उपलब्ध
Pakistan Economy Crisis: सध्या आपला शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) आर्थिक संकटाशी झुंजत आहे. तिथले चलन सतत कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे महागाईचे दर प्रचंड वाढत आहेत.
Pakistan Economy Crisis: सध्या आपला शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) आर्थिक संकटाशी झुंजत आहे. तिथले चलन सतत कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे महागाईचे दर प्रचंड वाढत आहेत. पाकिस्तानमध्ये (Pakistan) खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून प्रत्येक वस्तूची किंमत गेल्या काही काळात अनेक पटींनी वाढली झाली आहे. तेथील ऑटोमोबाईल उद्योगालाही या आर्थिक संकटाचा फटका बसला आहे. जिथे दुचाकीपासून सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पाकिस्तानच्या (Pakistan) ऑटोमोबाईल उद्योगाची सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेऊया.
Pakistan Economy Crisis: या महिन्यात टोयोटाची वाहने पुन्हा महाग झाली
पाकिस्तानमध्ये (Pakistan) टोयोटाची (Toyota) वाहने असेंबलिंग आणि विक्रीचे काम इंडस मोटर कंपनी (IMC) करते. स्थानिक चलनाच्या कमकुवत स्थितीमुळे कंपनीने जानेवारी 2023 मध्ये दुसऱ्यांदा आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. टोयोटा कारच्या किमती सुमारे 11.5 लाख रुपयांनी वाढल्या आहेत. टोयोटा कोरोला 1.6 CVT ची किंमत आता 380,000 रुपयांनी वाढून 5.749 मिलियन झाली आहे. दुसरीकडे Corolla 1.8 CVT ची किंमत आता 430,000 रुपयांनी वाढून 6.07 लाख रुपये झाली आहे.
कंपनीने फॉर्च्युनरच्या (Toyota Fortuner) किंमतींमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे, ज्यामध्ये फॉर्च्युनर (Toyota Fortuner) डिझेल लीजेंड 1.16 कोटी रुपयांनी महागले आहे. आता त्याची किंमत 17.07 मिलियन (सुमारे 1.7 कोटी रुपये) झाली आहे. आयएमसीच्या म्हणण्यानुसार, आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी (Pakistan Economy Crisis) रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाल्यामुळे कंपनीच्या वाहन उत्पादन खर्चावर विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे किंमती वाढल्या आहेत.
Pakistan Economy Crisis: दुचाकींच्या दरातही झाली वाढ झाली
वाढत्या महागाईमुळे अनेक वाहन कंपन्यांनी महागड्या नवीन वाहनांचे बुकिंग बंद केले आहे. तसेच 1 फेब्रुवारीपासून बाईकच्या किमती 20,000-25,000 रुपयांनी वाढणार आहेत.
Pakistan Economy Crisis: सुझुकी कारच्या किमती वाढल्या
एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये (Pakistan) सुझुकीच्या (Suzuki) कारच्या किमतीही वाढल्या आहेत. तिथे Alto VX ची किंमत 160,000 रुपयांनी वाढून 18.59 लाख रुपये झाली आहे. तर वॅगन आरची किंमत 257,000 रुपयांनी वाढून 26.29 लाख रुपये झाली आहे. दरम्यान, या बातमीत नमूद केलेल्या वाहनांच्या किंमती पाकिस्तानी (Pakistan) रुपयात आहेत. सध्या पाकिस्तानचे 3 रुपये भारताच्या 1 रुपयाच्या बरोबरीचे आहेत.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: