Ola Electric : 15 ऑगस्टला ओला इलेक्ट्रिकचा धमाका; नवीन प्रोडक्ट्स होणार लाँच
Ola Electric : 2024 मध्ये, कंपनी आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारसह चारचाकी विभागात प्रवेश करेल.
OLA Electric : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी, ओला इलेक्ट्रिकने (OLA Electric) 15 ऑगस्ट 2021 रोजी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) Ola S1 Air सह EV च्या जगात प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांत कंपनीने या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या दरम्यान, ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक सॉफ्टवेअर अपडेट्स, फीचर एन्हांसमेंट्स आणि नवीन व्हेरियंट्सची सुरुवात पाहायला मिळाली. दरम्यान, आता कंपनीने या वर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त Ola S1 चे नवीन व्हेरिएंट दोन इतर करल ऑप्शनसह सादर केले जाण्याची शक्यता आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं 'हे' नाव असण्याची शक्यता
आगामी ओला इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पाहायला गेल्यास नवीन व्हेरिएंटचे नाव Ola S1 Pro Classic असण्याची शक्यता आहे. या आगामी मॉडेलमध्ये रेट्रो डिझाईन एलिमेंट्स दिसू शकतात. तसेच, हे सेंटर स्टँड, विंडशील्ड आणि कुशन बॅकरेस्ट सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज केले जाऊ शकते. यासह ओला S1 ई-स्कूटरसाठी दोन नवीन कलर ऑप्शन देखील आणणार आहे, ज्यामध्ये लाईम ग्रीन आणि इलेक्ट्रिक ब्लू कलरचा समावेश आहे.
11 कलर ऑप्शनचा पर्याय
कदाचित इलेक्ट्रिक स्कूटरचे तीनही व्हेरिएंट (S1 Standard, S1 Pro आणि S1 Air) या नवीन शेड्समध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे. सध्या, ओलाचे ई-स्कूटर्स लिक्विड सिल्व्हर, जेट ब्लॅक, मॅट ब्लॅक, अँथ्रासाईट ग्रे, कोरल ग्लॅम, पोर्सिलेन व्हाईट, ओचर, मिडनाईट ब्लू, निओ मिंट, मिलेनियल पिंक आणि मार्शमॅलो यासह 11 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत.
या व्यतिरिक्त, अशी अपेक्षा आहे की, ओला आपल्या इलेक्ट्रिक लाईन-अपमध्ये इलेक्ट्रिक बाईक्स देखील समाविष्ट करू शकते. याचा टीझर कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज केला होता. ओलाच्या आगामी ई-बाईक रेंजमध्ये क्रूझर, अॅडव्हेंचर बाईक, स्क्रॅम्बलर, सुपरस्पोर्ट मॉडेल आणि कम्युटर बाईक यांचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे.
याशिवाय, 2024 मध्ये कंपनी आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारसह चारचाकी विभागात प्रवेश करेल. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे, ओला इलेक्ट्रिक कार नवीन उत्पादन श्रेणीचा भाग असणार नाही, जे 15 ऑगस्ट रोजी लॉंंच होणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये ओला इलेक्ट्रिक कारचा समावेश असणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :