(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahindra XUV 400 इलेक्ट्रिक SUV मध्ये या 5 गोष्टी आहेत खास; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Mahindra XUV 400 Electric SUV : कंपनीच्या XUV300 वर आधारित नवीन महिंद्रा XUV400 हे या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन आहे.
Mahindra XUV 400 Electric SUV : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्राने नुकतीच देशात पहिली इलेक्ट्रिक SUV XUV400 (Mahindra XUV 400 Electric SUV) लॉन्च केली आहे. ही नवीन एसयूव्ही थेट टाटाच्या नेक्सॉन ईव्हीशी (Tata Nexon EV ) टक्कर देईल. कंपनीने या कारसाठी बुकिंग सुरू केलं आहे. ही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या कारच्या संदर्भात पाच महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.
1. Mahindra XUV 400 Electric SUV किंमत किती? (Price)
कंपनीच्या XUV300 वर आधारित नवीन महिंद्रा XUV400 हे या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. तसेच कंपनीच्या Twin Pix लोगोसह येणारी पहिली Mahindra EV आहे. या कारचं बुकिंग सुरू झालं आहे आणि कंपनीने पहिल्या वर्षाच्या अखेरीस 20,000 युनिट्सची डिलिव्हरी करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे. या कारची किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते ती 18.99 लाख रुपयांपर्यंत आहे.
2. Mahindra XUV 400 Electric SUV ची रेंज किती? (Specifications)
XUV400 EV मध्ये दोन बॅटरी पॅकची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 39.4 kWh आणि 34.5 kWh चा समावेश आहे. यामध्ये साधारण 456 किमी आणि 375 किमीची रेंज उपलब्ध आहे.
3. XUV400 मध्ये फ्रंट एक्सलवर इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 150bhp पॉवर आणि 310Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 150 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. तसेच, ही कार 0-100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 8.3 सेकंद घेते. याला मल्टी-ड्राइव्ह मोड मिळतात जे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह थ्रॉटलला अॅडजस्ट करतात.
4. Mahindra XUV 400 Electric SUV 'ही' आहेत वैशिष्ट्य (Features)
लहान बॅटरी पॅकसह XUV400 ला 3.3kW आणि 7.2kW चार्जरचा पर्याय मिळतो, तर मोठ्या बॅटरी पॅकमध्ये फक्त 7.2kW चार्जरचा पर्याय मिळतो. 7.2 चार्जरसह, चार्ज होण्यासाठी या कारला 6 तास 30 मिनिटं लागतात तर DC फास्ट चार्जरसह, कार 50 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होऊ शकते.
5. XUV 400 EV चा व्हीलबेस 2600 mm आहे. 4200 मिमी लांबीसह, ती सब 4m SUV पेक्षा मोठी आहे. डिझाईन आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत, याला कॉपर इन्सर्ट, 7-इंच टचस्क्रीन, सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक, OTA अपडेट्स, ऑटो हेडलॅम्पसह बरेच फिचर्स देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :