एक्स्प्लोर

Mahindra XUV 400 लवकरच होणार लॉन्च, Nexon EV Max ला देणार टक्कर

Mahindra XUV 400: इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत महिंद्रा अँड महिंद्रा देखील आपली नवीन कार उतरवणार आहे. कंपनी  पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV 400 लॉन्च करणार आहे.

Mahindra XUV 400: इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत महिंद्रा अँड महिंद्रा देखील आपली नवीन कार उतरवणार आहे. कंपनी  पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV 400 लॉन्च करणार आहे. ही कार बाजारात बेस, ईपी आणि ईएल अशा तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. XUV300 वर आधारित आणि 'बॉर्न इलेक्ट्रिक' लाइन-अप अंतर्गत ही कार तयार करण्यात आली आहे. ही महिंद्राची ऑल न्यू इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही कार एका चार्जवर 456 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.

डिझाइन

नवीन Mahindra XUV 400 Closed Grill आणि 'ट्विन पीक्स' लोगोसह येईल. कारला कॉपर-फिनिश इन्सर्ट, रुंद एअर डॅम, मस्क्युलर बोनेट, स्वेप्ट-बॅक, ओआरव्हीएम, 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स, रूफ माउंटेड स्पॉयलर, एलईडी हेडलाइट्स, बूमरँग-आकाराचे डीआरएल, साइड्स मिळतात. महिंद्राने या नवीन इलेक्ट्रिक कारसाठी त्यांचे इलेक्ट्रिक स्केलेबल आणि मॉड्युलर आर्किटेक्चर (MESMA) प्लॅटफॉर्म वापरला आहे. यामध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 150bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. पॉवरसाठी या कारला 39.5kW चा बॅटरी पॅक मिळेल. ज्याच्या मदतीने ही कार एका चार्जवर 456 किलोमीटर चालण्यास सक्षम आहे. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार केवळ 50 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते.

फीचर्स 

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एक मोठी 5-सीटर केबिन देण्यात आली आहे. केबिनला कनेक्टेड कार टेक, 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पॅनल, लेदर-रॅप्ड मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, कॉपर-कलर ट्रायम्स असलेला ऑल-ब्लॅक डॅशबोर्ड देखील मिळतो. सहा एअरबॅगसह सनरूफ, ABS आणि EBD सारखे सेफ्टी फीचर्सही यात पाहायला मिळतात.

किती असेल किंमत?

सध्या कंपनीने या एसयूव्हीची किंमत जाहीर केलेली नाही. जानेवारी 2023 मध्ये ही कार लॉन्च होण्याच्या वेळी याचा खुलासा केला जाईल. पण या कारची प्रारंभिक किंमत सुमारे 15 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. दरम्यन, किंमत आणि रेंजच्या बाबतीत Mahindra XUV 400 भारतीय बाजारपेठेत Tata Nexon EV Max शी स्पर्धा करेल. Nexon EV Max ला 40.5kWh बॅटरी पॅक मिळतो. जो 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरते करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला आहे. या कारला ARAI प्रमाणित 437 किमीची रेंज मिळते. 50kW DC फास्ट चार्जरसह, ही कार केवळ 56 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.34 लाख रुपयांपासून सुरू होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget