(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahindra कडून Scorpio N ऑटोमॅटिक आणि 4WD व्हेरियंटची किंमत जाहीर, जाणून घ्या
Mahindra Scorpio Automatic Launched : असा दावा केला जातोय की, ही जगातील पहिली SUV आहे ,ज्याला What3Words नेव्हिगेशन सिस्टम देण्यात आली आहे, जी व्हॉईस कमांडवर काम करते.
Mahindra Scorpio Automatic Launched : महिंद्राने नवीन Scorpio N च्या ऑटोमॅटिक आणि 4 व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची किंमत जाहीर केली आहे. नवीन Scorpio N Z4 पेट्रोलची एक्स-शोरूम किंमत 15.45 लाख रुपये आहे जी Z8L व्हेरियंटसाठी 21.45 लाख रुपये आहे. नवीन Scorpio N च्या स्टँडर्ड व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने ही SUV 5 ट्रिममध्ये लॉन्च केली आहे - Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L, तर ती पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये सादर केली गेली आहे. महिंद्रा कंपनीचे म्हणणे आहे की, पहिल्या 25,000 बुकिंगवर ही किंमत लागू आहे
30 जुलैपासून बुकिंग सुरू होणार
2022 Mahindra Scorpio N चे बुकिंग 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कंपनीच्या डीलरशिपवर किंवा ऑनलाइन सुरू होईल, ग्राहकांना सणासुदीच्या काळात उपलब्ध होईल. 5 जुलैपासून, कंपनीने ग्राहकांना त्यांच्या कार्टमध्ये जोडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नवीन Scorpio N चा टेस्ट ड्राइव्ह ग्राहकांसाठी 5 जुलैपासून भारतातील 30 शहरांमध्ये आणि 15 जुलैपासून देशभरात सुरू झाला आहे. प्रथम येणाऱ्या महिंद्रा ग्राहकांना प्रथम सेवा या तत्त्वावर 25,000 बुकिंग देणार आहे.
नवीन स्कॉर्पिओची स्पर्धा जोरदार
महिंद्राने नवीन Scorpio N ला शहरी SUV म्हणून संबोधले आहे जी पूर्णपणे सुधारित करण्यात आली आहे आणि त्यासोबत सर्व काही नवीन देण्यात आले आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन पिढीच्या मॉडेलचे बाह्य आणि अंतर्गत भाग पूर्णपणे नवीन आहे. स्पर्धेबाबत बोलायचं झालं तर, भारतीय बाजारपेठेतील टाटा हॅरियर, टाटा सफारी, ह्युंदाई क्रेटा आणि ह्युंदाई अल्काझार यांसारख्या कारशी स्पर्धा होणार आहे.
स्कॉर्पिओ क्लासिकच्या तुलनेत मोठी कार
Mahindra Scorpio N ची Scorpio Classic सोबच तुलना केल्यास, ती 206 mm लांब, 97 mm रुंद आणि 70 mm अधिक व्हीलबेससह बाजारात आणली गेली आहे. नवीन पिढीसाठी 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि शार्कफिन अँटेना यांसारखे बाह्य बदल देण्यात आले आहेत. डीप फॉरेस्ट, डॅझलिंग सिल्व्हर, रॉयल गोल्ड, नेपोली ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट, रेड रेज आणि ग्रँड कॅनन या 7 रंगांमध्ये एसयूव्ही ऑफर करण्यात आली आहे.
केबिनमध्ये काय नवीन?
व्हीलबेस वाढल्याने, नवीन स्कॉर्पिओ N चे केबिन अधिक प्रशस्त झाले आहे आणि महिंद्राने ते प्रीमियम बनवले आहे. येथे 12-स्पीकर सोनी प्रणालीसह 3D सराउंड साउंड सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, 20.32-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, सेगमेंटमधील सर्वात रुंद सनरूफ, लेदरेट सीट आणि 70 हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये SUV च्या केबिनमध्ये देण्यात आली आहेत. येथे Adrenox द्वारे तापमान नियंत्रण करता येते. याशिवाय दावा केला जात आहे की ही जगातील पहिली SUV आहे ,ज्याला What3Words नेव्हिगेशन सिस्टम देण्यात आली आहे, जी व्हॉईस कमांडवर काम करते.
मजबूत इंजिन
Amstallion पेट्रोल इंजिन नवीन Scorpio N सह दिले गेले आहे, जे 200 PS पॉवर आणि 380 Nm पीक टॉर्क बनवते. दुसरीकडे, mHawk डिझेल इंजिन 175 PS पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही नवीन एसयूव्ही सर्वात कमी प्रदूषण करणारी कार म्हणून समोर आली आहे. कंपनीने हे दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह सुसज्ज केले आहेत. यासोबतच या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच या एसयूव्हीमध्ये शिफ्ट बाय केबल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
नवीन एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीनेही मजबूत
Mahindra Scorpio N मध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल, ब्रेक डिस्क वाइपिंग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्रीफिल, ई-कॉल, SOS स्विच आणि रोल ओव्हर मिटिगेशन आणि इतर अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, नवीन एसयूव्ही अनेक ड्रायव्हिंग मोडसह आली आहे ज्यात टार्मॅक, स्नो, मड आणि डेझर्ट यांचा समावेश आहे. नवीन कारला 4Xplore टेरेन मॅनेजमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे.