Mahindra Electric SUV: महिंद्राने सादर केली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही, आकाराने XUV 400 पेक्षा आहे मोठी
Mahindra Rall-E SUV: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने हैदराबादमध्ये भारतातील पहिल्या फॉर्म्युला ई रेसच्या निमित्ताने Rall-E इलेक्ट्रिक SUV कार प्रदर्शित केली आहेत.
Mahindra Rall-E SUV: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये यूकेमध्ये न्यू बॉर्न-इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्हीची संपूर्ण रेंज सादर केली होती. आता कंपनीने हैदराबादमध्ये भारतातील पहिल्या फॉर्म्युला ई रेसच्या निमित्ताने ही इलेक्ट्रिक SUV कार प्रदर्शित केली आहेत. फॉर्म्युला ई रेस इव्हेंटमध्ये कंपनी M9 इलेक्ट्रो रेस कार वापरणार आहे. यासोबतच कंपनीने एक कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार Rall-E देखील प्रदर्शित केली आहे.
Mahindra Rall-E SUV: BE.05 इलेक्ट्रिक SUV वर आधारित
ही कार कंपनीच्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV BE.05 ची मोठी आणि स्पोर्टियर व्हर्जन आहे. नवीन Mahindra BE Rall-E इलेक्ट्रिक SUV ला शायनी यलो स्कीममध्ये ORVM साठी पियानो ब्लॅक ट्रीटमेंट देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइन केलेले बंपर आणि चंकी व्हील आर्च देण्यात आले आहेत. फ्रंटला एलईडी डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे आणि खालच्या बंपरवर वर्तुळाकार एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. यासोबतच पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना टो हुक देण्यात आले आहेत. या कारमध्ये 16 इंची स्टील व्हील देण्यात आली आहेत. या इलेक्ट्रिक एसयूव्हीला अधिक ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे, ज्यामुळे ऑफ-रोडिंग सोपे होते. याला कूप-एसयूव्ही स्टाइलिंग, फ्लश-प्रकारचे डोअर हँडल्स आणि मागील बाजूस स्लिम एलईडी लाइट बार देण्यात आला आहे.
BE.05 इलेक्ट्रिक SUV कॉन्सेप्ट कार 2025 च्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ही कार XUV400 च्या वर असेल. ही कार MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी स्पर्धा करेल. कारची लांबी 4,370mm, रुंदी 1,900mm आणि उंची 1,635mm आहे आणि तिचा व्हीलबेस 2,775mm आहे. या कारमध्ये ड्रायव्हर-सेंट्रिक केबिन देण्यात आली आहे, ज्यामध्ये एसी कंट्रोल आणि इतर फंक्शन्ससाठी कोणतेही बटण दिलेले नाही. यात ड्युअल टचस्क्रीन आहे, जिथून सर्व नियंत्रणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात. महिंद्रा BE 05 इतर इलेक्ट्रिक SUV प्रमाणे INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जे फोक्सवॅगन ग्रुपच्या MEB प्लॅटफॉर्मवरील एलिमेंटसह विकसित केले गेले आहे.
Mahindra Rall-E SUV: या कारशी होणार स्पर्धा
ही कार भारतीय बाजारपेठेत MG च्या ZS EV शी स्पर्धा करेल, ज्याला 50 kWh बॅटरी पॅक मिळतो. ही कार प्रति चार्ज 461 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.