Lamborghini Huracan Sterrato : 4.61 कोटींची जबरदस्त Lamborghini कार भारतात लॉन्च, याच्या समोर भल्याभल्या कार आहेत फेल
Lamborghini Huracan Sterrato launched in India: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Lamborghini India ने आपली नवीन ऑफ-रोड-रेडी Lamborghini Huracan Sterrato भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
Lamborghini Huracan Sterrato launched in India: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Lamborghini India ने आपली नवीन ऑफ-रोड-रेडी Lamborghini Huracan Sterrato भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची एक्स-शोरूम किंमत 4.61 कोटी इतकी ठेवली आहे. कंपनी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. कंपनीने Huracan Sterrato चा नोव्हेंबरमध्ये खुलासा केला होता. या कारच्या फक्त 1,499 युनिट्सपर्यंत विकल्या जाणार आहे.
LAMBORGHINI HURACAN STERRATO GROUND CLEARANCE : ऑफ रोडींगसाठी बेस्ट आहे ही कार
Huracan Sterrato ला अनेक प्रकारेअपग्रेड करण्यात आले आहे. ज्यामुळे ही कार ऑफ-रोडिंगसाठी बेस्ट (Best Off Roading Cars in India) असल्याचं बोललं जात आहे. लॅम्बोर्गिनीने या स्पोर्ट्स (Best Sports Car in India) कारचा सस्पेंशन ट्रॅव्हल वाढवून ग्राउंड क्लीयरन्स 44 मिमीने वाढवला आहे. याला अॅल्युमिनियम फ्रंट अंडरबॉडी प्रोटेक्शन आणि प्रबलित सिल्स तसेच रूफ माउंटेड एअर इनटेक मिळते. Huracan Sterrato अपडेटेड व्हेईकल डायनॅमिक्स पॅक किंवा LDVI (लॅम्बोर्गिनी इंटिग्रेटेड व्हेईकल डायनॅमिक्स) सह येतो, जे सुपरकार आणि री-कॅलिब्रेटेड स्ट्राडा आणि स्पोर्ट मोडसाठी नवीन रॅली मोड देते. ऑफ-रोडसाठी तयार या सुपरकारला नवीन 19-इंच अलॉय व्हील देखील मिळतात. ज्याचा आकार मानक Huracan पेक्षा लहान आहे. यामध्ये ड्युअल टायर बसवण्यात आले असून ते रन-फ्लॅट तंत्रज्ञानासह येतात.
Lamborghini Huracan Sterrato Engine : इंजिन
या कारमध्ये 5.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड V10 इंजिन देण्यात आले आहे. जे Huracan च्या स्टँडर्ड मॉडेलवरून घेतले गेले आहे. हे इंजिन 610 Bhp पॉवर आणि 560 Nm टॉर्क जनरेट करते. Sterrato नियमित Huracan पेक्षा 30 bhp आणि 40 Nm कमी पॉवर आणि टॉर्क जनरेट करते.
Lamborghini Huracan Sterrato Top Speed: फक्त 3.4 सेकंदात पकडते 0-100 किमी प्रतितास वेग
याचे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे सर्व चार चाकांना इलेक्ट्रोनिकली नियंत्रित ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आणि मागील यांत्रिक स्व-लॉकिंग डिफरेंशियलद्वारे पॉवर पाठवते. लॅम्बोर्गिनीचा दावा आहे की, Sterrato 0-100 किमी प्रतितास 3.4 सेकंदात वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड 260 किमी प्रतितास आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: