एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

2023 Kia Seltos facelift पूर्वीपेक्षा किती पॉवरफुल आहे? नवीन अपडेट कोणते? वाचा A to Z माहिती

2023 Kia Seltos facelift vs old : 2023 किआ सेल्टोस फेसलिफ्टचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या SUVच्या इंटर्नल आणि एक्सटर्नल भागात मोठे बदल करण्यात आले आहेत.

2023 Kia Seltos facelift vs old : 2023 किआ सेल्टोस फेसलिफ्टचे (2023 Kia Seltos facelift) नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या एसयूव्हीच्या इंटर्नल आणि एक्सटर्नल भागात फार मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच, नवीन पॉवरफुल पेट्रोल इंजिन देखील देण्यात आलं आहे. सध्या ही कार लॉन्च झालेली नाही पण लवकरच या कारची बुकिंग सुरु करण्यात येईल असं कंपनीने म्हटलं आहे.  त्याआधी 2023 Kia Seltos facelift मध्ये कोणते नवीन अपडेट करण्यात आले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

2023 Kia Seltos Facelift कारचा लूक कसा असेल?

पूर्वीप्रमाणे, सेल्टोस टेक लाईन, जीटी लाईन आणि एक्स-लाईन ट्रिममध्ये विकले जातील. प्रत्येकामध्ये तुम्हाला अप्रतिम वैशिष्ट्य आढळतील. डिझाईनमध्ये झालेल्या अपडेट्समध्ये एक नवीन बंपर देण्यात आला आहे. या कारच्या एक्सटर्नल भागात दिसणारे सर्व लॅम्प किआ सिग्नेचर स्टार मॅप लाइटिंग कन्सेप्टमध्ये देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये तुम्हाला एलईडी टर्न इंडिकेटर आणि नवीन आईस क्यूब एलईडी फॉग लॅम्पसह नवीन क्राउन एलईडी हेडलाईट पाहायला मिळेल.

या कारची साईड प्रोफाईल पाहिल्यास, तुम्हाला नवीन 18-इंच क्रिस्टल कट ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. नवीन बंपर आणि इतर बदलांमुळे वाहनाची लांबी 50 मिमीने वाढवली आहे. नवीन सेल्टोस 8 मोनोटोन, 2 ड्युअल टोन आणि एक Xclusive मॅट ग्रेफाइट कलर ऑप्शनसह उपलब्ध आहे. यामध्ये नवीन प्युटर ऑलिव्ह कलरचा समावेश करण्यात आला आहे.  

2023 Kia Seltos Facelift कारचे स्पेसिफिकेशन्स काय?

जर तुम्ही 2023 Kia Seltos च्या इंटर्नल भाग पाहिलात तर यामध्ये अनेक फिचर्स अपडेट करण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्हाला दोन 10.25-इंच स्क्रीन मिळतात, एक टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि दुसरी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी देण्यात आला आहे. कारमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल देण्यात आला आहे. याशिवाय क्लस्टरमध्ये 8-इंच हेड-अप डिस्प्ले, हवेशीर आसनांसह 8-वे पॉवर ड्रायव्हर सीट, 8-स्पीकरसह बोस प्रीमियम साउंड सिस्टम, स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर देण्यात आले आहेत. 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला 2023 Kia Seltos Facelift कारमध्ये ADAS लेव्हल 2 फीचर्स देखील मिळतील. इतकेच नाही तर ADAS व्यतिरिक्त, 15 सुरक्षा वैशिष्ट्ये, 6 एअरबॅग आणि 3 पॉइंट सीट बेल्ट देखील उपलब्ध आहेत.

2023 Kia Seltos Facelift इंजिन कसे असेल?

2023 Kia Seltos Facelift च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, 2023 kia SELTOS ला पूर्णपणे नवीन 1.5 लिटर T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 160 ps आणि 253 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह तुम्हाला 6-iMT आणि 7 DCT चा पर्याय मिळेल. नवीन इंजिनबरोबर तुम्हाला जुने पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील दिले जात आहे. 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आणि 1.5 लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन ज्यासह तुम्हाला अनेक ट्रान्समिशन देखील मिळतील. म्हणजेच, तीन इंजिन आणि 5 ट्रान्समिशन ज्यामध्ये MT, iMT, IVT, 6AT, आणि 7DCT चा पर्याय उपलब्ध असेल असे नवीन वैशिष्ट्य या कारमध्ये आहेत. 

2023 Kia Seltos Facelift किंमत किती?

2023 Kia Seltos Facelift ची किंमत साधारण 11 लाख ते 21 लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget