एक्स्प्लोर

Kia Syros : किया इंडियाची बहुप्रतिक्षित 'किया सिरॉस' SUV लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Kia Syros Launch :  आकर्षक डिझाइन, स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांनी सुसज्ज अशी एसयूव्‍ही किया सिरॉस भारतीय बाजारपेठेत अवतरली आहे. 

मुंबई : किया इंडियाने बहुप्रतिक्षित किया सिरॉस लाँच केली आहे. ही क्रांतिकारी एसयूव्‍ही डिझाइन, तंत्रज्ञान आणि स्‍पेसमध्‍ये नवीन मानक स्‍थापित करण्‍यास सज्‍ज आहे. सुधारित के१ प्‍लॅटफॉर्मवर निर्माण करण्‍यात आलेली सिरॉस शहरी ड्रायव्‍हर्स आणि तंत्रज्ञान-प्रेमी अॅडव्‍हेंचर्सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या कारमध्‍ये वैविध्‍यतेसह अत्‍याधुनिक सुधारणांचे उत्तम संयोजन आहे. या मॉडेलमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट रिअर स्‍लाइडिंग, रिक्‍लायनिंग आणि व्हेंटिलेटेड सीट्ससह इतर विविध सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ व लेव्‍हल २ एडीएएससह १६-ऑटोनॉमस सेफ्टी वैशिष्‍ट्ये, ज्‍याला पूरक २० रॉबस्‍ट हाय स्‍टँडर्ड सेफ्टी पॅकेजचे सर्वसमावेशक सूट आहे.

किया सिरॉस चार प्रमाणित ट्रिम्‍स व २ पर्यायी ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल - एचटीके, एचटीके (ओ), एचटीके+, एचटीएक्‍स आणि एचटीएक्‍स+, एचटीएक्‍स+ (ओ), जे ग्राहकांच्‍या विविध गरजा व प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करण्‍यासाठी अनेक पर्याय देतात.

किया इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. ग्‍वांगू ली ब्रँडच्या दृष्टिकोनाबाबत सांगत म्‍हणाले, ''किया इंडियाने नेहमी चॅलेंजर उत्‍साह राखला आहे, तसेच नाविन्‍यता, तंत्रज्ञान व ग्राहक-केंद्रित डिझाइनप्रती आमच्‍या कटिबद्धतेसह ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आहे. पहिल्‍या लाँचपासून आमचा प्रवास उल्‍लेखनीय राहिला आहे, जेथे देशभरात उपस्थिती वाढत आहे आणि उच्‍च दर्जाच्‍या, महत्त्वाकांक्षी वेईकल्‍स वितरित करण्‍यावर फोकस आहे. सिरॉससह आम्‍ही आमचे उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहोत, तसेच एसयूव्‍हीच्‍या नवीन प्रजाती ऑफर करत आहोत, ज्‍यामध्‍ये उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे.''

डिझाइन: आकर्षकता व कार्यक्षम नाविन्‍यतेचे उत्तम संयोजन

सिरॉसच्‍या बाहेरील भागामधून कियाचे 'ऑपोझिट्स युनायटेड' तत्त्व दिसून येते, ज्‍यामध्‍ये आकर्षकता व कार्यक्षम वैविध्‍यतेचे संयोजन आहे. या कारची आकर्षक डिझाइन सर्वांचे लक्ष वेधून घेते, ज्‍यामध्‍ये कियाचे सिग्‍नेचर स्‍टारमॅप एलईडी लायटिंग आहे, जे सर्वोत्तम व आकर्षक लुकची खात्री देते. विशिष्‍ट किया सिग्‍नेचर डिजिटल टायगर फेस रस्‍त्‍यावर कारच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करते, तर आर१७ (४३.६६ सेमी) क्रिस्‍टल कट अलॉई व्‍हील्‍स, स्‍टीमलाइन डोअर हँडल्‍स, पडल लॅम्‍प्‍ससह किया लोगो प्रोजेक्‍शन आणि प्रबळ कॉन्‍चर्स हे सर्व घटक वेईकलच्‍या डायनॅमिक व लक्षवेधक अपीलमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करतात. 

इंटीरिअर: आरामदायीपणा व वैविध्‍यतेला नेले नव्‍या उंचीवर

२,५५० मिमी व्‍हीलबेससह सिरॉस केबिन सर्वोत्तम इंटीरिअर अनुभव देते, ज्यामध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट स्‍लाइडिंग व रिक्‍लायनिंग, ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स आहेत, जेथे बूट स्‍पेस समायोजित करता येते. फ्रण्‍ट व रिअर व्‍हेंटिलेटेड सीट्स आरामदायीपणा व वैविध्‍यततेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात. केबिनमध्‍ये ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल - कनेक्‍टेड कार नेव्‍हगिशन कॉकपीट, ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, स्‍पोर्टी अलॉई पेडल्‍स आणि ६४ कलर अॅम्बियण्‍ट मूड लायटिंग, डबल डी-कट स्‍टीअरिंग व्‍हील, ४-वे पॉवर्ड ड्रायव्‍हर सीट अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी आधुनिक लक्‍झरी वातावरण तयार करतात.

तंत्रज्ञान आणि कनेक्‍टीव्‍हीटी: विनासायास एकीकरण आणि नियंत्रण

फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्यांचा समावेश करण्‍यात आलेली सिरॉस अद्वितीय सोयीसुविधा व अत्‍याधुनिक कनेक्‍टीव्‍हीटीसह ८० हून अधिक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. वेईकलमध्‍ये ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल आहे, तसेच सर्वोत्तम व युजर-अनुकूल इंटरफेस आहे, जे वायरलेस अॅप्‍पल कारप्‍ले आणि अँड्रॉइड ऑटोसह विनासायासपणे एकीकृत होतात, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्सना त्‍यांचे आवडते अॅप्‍स व मीडिया सहजपणे उपलब्‍ध होतात. तसेच, सिरॉस फर्स्‍ट-इन-सेगमेंट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्ससह २२ कंट्रोलर्सचे ऑटोमॅटिक अपडेटिंग देते, ज्‍यामधून वेईकल आधुनिक सॉफ्टवेअर व वैशिष्‍ट्यांसह नेहमी सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळते, ज्‍यासाठी डिलरशिपला भेट देण्‍याची गरज भासत नाही.

सिरॉसमध्‍ये अधिक उत्‍साहवर्धक अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८ स्‍पीकर्स साऊंड सिस्‍टम, स्‍मार्टफोन वायरलेस चार्जर सारखी वैशिष्‍ट्ये आहेत. कॉल सेंटर-असिस्‍टेड नेव्हिगेशनसह ड्रायव्‍हर्स कुठेही प्रवास करताना रिअल-टाइम मार्गदर्शनाचा आनंद घेऊ शकतात.

सुरक्षितता आणि कार्यक्षमता: आत्‍मविश्‍वासपूर्ण ड्रायव्हिंगची खात्री व सुधारित

कियाच्‍या डिझाइन तत्त्वामध्‍ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य दिले जाते आणि सिरॉसमधील प्रगत वैशिष्‍ट्यांच्‍या सर्वसमावेशक सूटमधून ही कटिबद्धता दिसून येते. सुधारित के१ प्‍लॅटफॉर्मवर निर्माण करण्‍यात आलेली सिरॉस उच्‍च दर्जाच्‍या रचनेची खात्री देते, ज्‍यामधून सुधारित क्रॅश प्रोटेक्‍शन व स्थिरता मिळते. एडीएएस लेव्‍हल २ सह सुसज्‍ज या वेईकलमध्‍ये १६ ऑटोनॉमस ड्रायव्हिंग वैशिष्‍ट्यांसह फॉरवर्ड कोलिजन अव्‍हॉयडन्‍स असिस्‍ट, लेन कीप असिस्‍ट, ३६० डिग्री कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर आणि स्‍मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्‍टॉप अँड गो अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामधून सुरक्षित व अधिक उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.

सिरॉसमध्‍ये २० स्‍टँडर्ड रॉबस्‍ट हाय-सेफ्टी वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल, सहा एअरबॅग्‍ज, वेईकल स्‍टेबिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्‍ड, यामुळे ड्रायव्‍हर व प्रवाशांच्‍या अधिक सुरक्षिततेची खात्री मिळते. किया कनेक्‍ट २.० मन:शांतीसह कनेक्‍टीव्‍हीटी देत सुरक्षितता अधिक वाढवते, ज्‍यामध्‍ये एसओएस इमर्जन्‍सी सपोर्ट, रिअल-टाइम डायग्‍नोस्टिक्‍स आणि स्‍टोलन वेईकल ट्रॅकिंग अशी वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे आधुनिक युगासाठी आवश्‍यक ड्रायव्हिंग स्‍टँडर्डमध्‍ये सुरक्षिततेला समाविष्‍ट करण्‍यात आले आहे.

हूडअंतर्गत, सिरॉसमध्‍ये दोन इंजिन पर्याय आहेत - स्‍मार्टस्‍ट्रीम १.०-लीटर टर्बो पेट्रोलसह ८८.३ केडब्‍ल्‍यू (१२० पीएस) / १७२ एनएम आणि १.५-लीटर सीआरडीआय डिझेलसह ८५ केडब्‍ल्‍यू (११६ पीएस) / २५० एनएम, तसेच मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आहे. २५५० मिमीचे लांब व्‍हीलबेस आणि सुधारित सस्‍पेंशनसह सिरॉस शहरातील ड्राइव्‍हसाठी गतीशीलतेमध्‍ये संतुलन राखत उच्‍च दर्जाच्‍या राइडचा आनंद देते.

सिरॉससह किया इंडिया ऑटोमोटिव्‍ह उद्योगामधील अग्रणी म्‍हणून आपला दर्जा अधिक दृढ करत आहे, तसेच नाविन्‍यता, डिझाइन व ग्राहक समाधानामधील मर्यादांना दूर करत आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget