Kawasaki Ninja ZX-10R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
New Bike Launch: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki आपल्या स्पोर्ट्स बाईकसाठी खूप लोकप्रिय आहे. अशातच कंपनीने नुकतीच एक नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे.
New Bike Launch: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki आपल्या स्पोर्ट्स बाईकसाठी खूप लोकप्रिय आहे. अशातच कंपनीने नुकतीच एक नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकचा नाव आहे 2023 Ninja ZX-10. अपडेटेड 2023 Kawasaki Ninja ZX-10R ची किंमत 15.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही बाईक आपल्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत 62,000 रुपये अधिक महाग आहे. लीटर-क्लास सुपरस्पोर्ट बाईक लाइम ग्रीन आणि नवीन पर्ल रोबोटिक व्हाइट या दोन पेंट स्कीममध्ये सादर करण्यात आली आहे.
इंजिन
कावासाकी निन्जा ZX-10R अजूनही देशातील सर्वात स्वस्त लिटर-क्लास बाईकपैकी एक आहे. भारत ही बाईक डुकाटी पानिगेल V4, Honda CBR1000RR-R Fireblade, Suzuki Hayabusa, Aprilia RSV4 बारीकशी स्पर्धा करेल.
यात 998cc, लिक्विड-कूल्ड, फोर-स्ट्रोक, इंधन-इंजेक्टेड, इनलाइन-फोर सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13,200 rpm वर 200 Bhp पॉवर आणि 11,400 rpm वर 115 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकमधील राइड परफॉर्मन्स बदलण्यासाठी स्पोर्ट, रोड, रेन आणि रायडर असे चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत.
फीचर्स
या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या स्वरूपात 4.3-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. बाईकच्या हार्डवेअरमध्ये यात 43 mm अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. ब्रेकिंग परफॉर्मन्स सुधारण्यासाठी याच्या समोर 330 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिमी डिस्क देण्यात आले आहे. 2023 Kawasaki Ninja ZX-10R ला कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल इत्यादींसह अनेक इलेक्ट्रॉनिक एड्स मिळतात. नवीन कावासाकी बाईक 2,085 मिमी लांब, 1,185 मिमी उंच आणि 750 मिमी रुंद आहे. याचा व्हीलबेस 1,450 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 135 मिमी आणि सीटची उंची 835 मिमी आहे. बाईकचे वजन 207 किलो आहे. या बाईकची इंधन टाकीची क्षमता 17-लिटर आहे.
दरम्यान, कावासाकीने या वर्षी जूनमध्ये 2022 निन्जा भारतात लॉन्च केली होती. नवीन Kawasaki Ninja ची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकला पॉवर देण्यासाठी, कंपनीने BS6 उत्सर्जन मानक आधारित 399cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन, FI इंजिन वापरले आहे. हे इंजिन 10,000 rpm वर 44.3 bhp पॉवर आणि 8000 rpm वर 37 Nm कमाल टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे.