Hyundai Venue लवकरच नवीन अवतारात; 'या' कारला देणार जबरदस्त टक्कर
Hyundai Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये, Hyundai Venue कारची स्पर्धा Maruti Suzuki Brezza या कारबरोबर होण्याची शक्यता आहे.
Hyundai Cars : कार निर्माता कंपनी ह्युंदाई (Hyundai) नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुंडाई नवीन वेन्यू (Hyundai New Venue) मार्च 2023 मध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. Hyundai कंपनीने मागील वर्षी जून 2022 मध्ये बाजारात आपली Hyundai Venue फेसलिफ्ट लाँच केली होती. आता ह्युंदाई वेन्यूचे नवीन मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे.
'हे' बदल असू शकतात
नवीन ह्युंदाईमध्ये मस्क्युलर हुड, डार्क क्रोम ग्रिल, रेड एक्सेंट, नवीन डिझाईनचे बंपर, प्रोजेक्टर LED हेडलाईट्स, इलेक्ट्रॉनिक ORVMs आणि नवीन अलॉय व्हिल यांसारखे फिचर्स पाहायला मिळू शकतात. तसेच याच्या बॅकसाईडला कनेक्टेड LED टेल लाईट्स आणि ड्युअल एग्जॉस्ट टिप्स देण्यात आले आहेत. या सर्व फिचर्समुळे कारचा लूक अधिकच आकर्षक झाला आहे.
तीन इंजिन पर्याय मिळू शकतात
सध्याची Hyundai Venue फेसलिफ्ट तीन इंजिन पर्यायांमध्ये येते. त्यामुळेच कंपनी हे मॉडेल सुरु ठेवेल अशी अपेक्षा आहे. ज्यामध्ये पहिले 1.2-L पेट्रोल इंजिन आहे, दुसरे 1.5-L डिझेल इंजिन आहे जे 100hp जास्तीत जास्त पॉवर आणि 240Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि तिसरे 1.0-L टर्बो-पेट्रोल इंजिन आहे जे 120hp उत्पादन करण्यास सक्षम आहे.
'हे' फीचर्स मिळू शकतात
नवीन Hyundai Venue च्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ब्लू लिंक कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जर, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, हाईट अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स असलेली नवीन टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. ज्यामुळे ते सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक वाटते. या कारच्या सीट्स फार आरामदायी आहेत. याशिवाय फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ऑटो क्लायमेट कंट्रोल (ACC), कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. त्याचबरोबर नवीन फीचर म्हणून अलेक्सा आणि गुगल व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील कारमध्ये दिला जाऊ शकतो.
कारची किंमत किती?
या कारची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही. मात्र, कार लॉन्चिंगच्या वेळी कारच्या किंमती संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल. पण कंपनी त्याची किंमत सध्याच्या व्हेन्यू कारपेक्षा जास्त ठेवू शकते. Hyundai Venue या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.62 लाख रुपये आहे.
कोणाबरोबर स्पर्धा करणार?
भारतीय ऑटो मार्केटमध्ये, Hyundai Venue कारची स्पर्धा Maruti Suzuki Brezza या कारबरोबर होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
BMW M3 CS लक्झरी कार लॉन्च, कंपनी बनवणार फक्त 1,000 युनिट्स; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत