BMW M3 CS लक्झरी कार लॉन्च, कंपनी बनवणार फक्त 1,000 युनिट्स; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Bmw M3 Cs Limited Edition: लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने आपल्या BMW M3 CS सेदान कारचा लिमिटेड एडिशन लॉन्च केला आहे.
Bmw M3 Cs Limited Edition: लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने आपल्या BMW M3 CS सेदान कारचा लिमिटेड एडिशन लॉन्च केला आहे. कंपनीने आपली ही नवीन कार अमिरिकेत लॉन्च केली आहे. BMW या कारचे फक्त 1,000 युनिट्स तयार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारचे काही मॉडेल्स भारतातही विकले जाऊ शकतात. या लिमिटेड एडिशन कारमध्ये ग्राहकांना अनेक आधुनिक आणि दमदार फीचर्स मिळणार आहेत. तसेच याचे इंजिनही पॉवरफुल आहे. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Bmw M3 Cs Limited Edition: डिझाइन
या कारचा लूक जवळपास तिच्या स्टँडर्ड मॉडेलसारखाच आहे. लक्झरी कारला लांब बोनेट, मोठी किडनी ग्रिल, रुंद एअर डॅम, फ्रंट एअर स्प्लिटर, स्लोपिंग रूफलाइन आणि पिवळ्या DRL सह एलईडी हेडलाइट्स देखील मिळतात. या लिमिटेड एडिशनच्या कारला खास मिक्स मेटलने बनवलेले विशेष हलके बनावट एम अलॉय व्हील्स मिळतात. याला मागील बाजूस रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्ससह डिफ्यूझर देखील मिळतो.
Bmw M3 Cs Limited Edition: इंजिन
नवीन BMW M3 CS Luxury मध्ये 3.0-L ट्विन-टर्बोचार्ज्ड, इनलाइन-सिक्स इंजिन वापरण्यात आले आहे, जे 543hp ची पॉवर आणि 650Nm चा सर्वाधिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिनला अॅक्टिव्ह एम डिफरेंशियल आणि xDrive ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) सिस्टम देण्यात आला असून याचा 8-स्पीड M स्टेपट्रॉनिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारचा टॉप स्पीड 313 किमी प्रतितास आहे.
Bmw M3 Cs Limited Edition: फीचर्स
स्पोर्टी पण आरामदायक 5-सीटर केबिन, कार्बन फायबर ट्रिमसह प्रीमियम डॅशबोर्ड, मेरिनो लेदर अपहोल्स्ट्री, एम कार्बन बकेट सीट्स, काळ्या रंगाचे हेडलाइनर, CFRP पॅडल शिफ्टर्ससह एम अलकंटारा स्टीयरिंग व्हील, 12.3-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. याशिवाय 49-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट कन्सोल, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात अनेक एअरबॅग देखील मिळतात.
Bmw M3 Cs Limited Edition: किंमत किती?
अमेरिकेत लॉन्च केलेली ही BMW M3 CS लक्झरी कार 96.78 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. जर ही कार भारतात लॉन्च झाली तर याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपासून कंपनी या लक्झरी कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: