Car : पेट्रोल की डिझेल कार? सर्वोत्तम कार कशी निवडावी? 'या' गोष्टींची काळजी घ्या
Car Selection : सध्या ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे वळल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अद्यापही बाजारातून पेट्रोल आणि डिझेल कार कमी झालेल्या नाहीत.
Petrol Car or Diesel Car : सध्या ग्राहक इलेक्ट्रिक कारला अधिक पसंती देताना पाहायला मिळतंय. मात्र अद्यापही बाजारातील पेट्रोल आणि डिझेल कार कमी झालेल्या नाहीत. मोठ्या संख्येने लोक पेट्रोल आणि डिझेल कार वापरतात आणि खरेदी करू इच्छितात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वतःसाठी नवीन कार घ्यायची असेल पण पेट्रोल कार घ्यायची की डिझेल कार घ्यायची याबद्दल संभ्रमात असाल तर हे नक्की वाचा. आम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला पेट्रोल कार घ्यायची की डिझेल कार घ्यायची हे तुम्ही अगदी सहज ठरवू शकाल. तुमच्यासाठी कोणती कार उत्तम आहे हे तुम्ही ठरवू शकाल.
डिझेल कार महाग
सर्वप्रथम या गाड्यांच्या किंमतीबद्दल जाणून घेऊयात. किमतीच्या बाबतीत डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा महाग आहेत. जर आपण मध्यम श्रेणीतील कार पाहिल्या तर त्यांची किंमत साधारणतः एक लाख रुपयांपेक्षा जास्त असते.
पेट्रोलपेक्षा डिझेल स्वस्त
जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, सामान्यतः डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या कारची इंधन टाकी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचाल, तेव्हा तुम्हाला पेट्रोल कारसाठी जास्त पैसे द्यावे लागतील तर डिझेल कारसाठी कमी.
डिझेल कारचे मायलेज अधिक
डिझेल कारचे मायलेज पेट्रोल कारपेक्षा जास्त आहे. त्यांच्या मायलेजमध्ये खूप फरक आहे. डिझेल आहे आणि डिझेल इंजिन अधिक मायलेजही देते.
डिझेल कारचा मेंटेनन्स खर्च जास्त
डिझेल कारचा मेंटेनन्स खर्च जास्त पेट्रोल कारपेक्षा थोडी जास्त आहे. डिझेल कारसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.
महत्वाच्या बातम्या :
- Maruti Suzuki : हिसाशी ताकेउची यांनी मारुती सुझुकी कंपनीचे MD आणि CEO म्हणून पदभार स्वीकारला
- मारुती आणि ह्युंदाईच्या 'या' जुन्या गाड्या मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत लोक, जाणून घ्या काय आहे कारण
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha