एक्स्प्लोर
Advertisement
येत आहे Honda ची नवीन SUV N7X, स्मार्ट लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स
Honda N7X SUV: भारतातील SUV ची वाढती मागणी आणि प्रचंड विक्री पाहता सर्व वाहन उत्पादक कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
Honda N7X SUV: भारतातील SUV ची वाढती मागणी आणि प्रचंड विक्री पाहता सर्व वाहन उत्पादक कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. आता याच शर्यतीत जपानी वाहन उत्पादक कंपनी Honda सुद्धा आपली नवीन SUV Honda N7X (संभाव्य नाव) येत्या काही दिवसात बाजारात आणू शकते. Honda ची नवीन एसयूव्ही Hyundai Creta, Kia Seltos, Tata SUV Harier आणि Mahindra XUV 700 ला भारतीय बाजारात टक्कर देणार. या एसयूव्हीचा लूक स्मार्ट असू शकतो. तसेच यात जबरदस्त फीचर्स कंपनी देऊ शकते.
इंजिन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन Honda N7X 5 सीटर आणि 7 सीटरच्या ऑप्शनमध्ये बाजारात सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये CVT ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळू शकतो. Honda ही SUV S, E, Prestige आणि Prestige HS सारख्या ट्रिम पर्यायांमध्ये देऊ शकते.
लूक आणि फीचर्स
लूकच्या बाबतीत Honda N7X ला Honda City आणि Civic सारख्या प्रीमियम सेडान सारख्या अपर नोझ शेप आकारात मोठ्या मल्टी-स्लॅट क्रोम ग्रिल मिळू शकतात. यामध्ये फॉग लॅम्प, मल्टी-स्पोक अलॉय व्हील, माउंटेड विंग मिरर, एलईडी हेडलॅम्प, ड्युअल टोनचे दरवाजे आणि एल-आकाराचे एलईडी डीआरएल देखील बंपरमध्ये दिसू शकतात. जर आपण या नवीन SUV च्या फीचर्सवर नजर टाकली तर यात अनेक एअरबॅग्ज, मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह इतर अनेक स्टॅंडर्ड आणि सेफ्टी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. भारतात या नवीन Honda SUV ची किंमत 12 लाख रुपयांच्या वर असू शकते.
महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement