एक्स्प्लोर

Mahindra Scorpio N चा मोठा विक्रम, अवघ्या 30 मिनिटांत झाली एक लाख कारची बुकिंग, कंपनीने केली 1800 कोटींची कमाई

Mahindra Scorpio N Booking: Mahindra Scorpio-N चे चाहते झपाट्याने वाढत आहेत, नुकत्याच लाँच झालेल्या या कारची क्रेझ इतकी आहे की, बुकिंग विंडो उघडताच अवघ्या 30 मिनिटांच्या आत 1 लाख वाहनांची विक्री झाली आहे.

Mahindra Scorpio N Booking: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या नवीन SUV The All New Scorpio-N ने बाजारात धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच लाँच झालेल्या या कारची क्रेझ इतकी आहे की, बुकिंग विंडो उघडताच पहिल्या 25000 युनिट्सचे बुकिंग एका मिनिटात झाले. तर पुढील 30 मिनिटांत स्कॉर्पिओ-एनचे एकूण एक लाख युनिट्स बुक झाले आहेत. अवघ्या 30 मिनिटात कंपनीने अंदाजित 1800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत XUV700 SUV बद्दल लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ होती. मात्र आता Scorpio-N बद्दल ही ग्राहकांची उत्सुकता दिसून आली आहे. 

Scorpio-N ने XUV700 ला मागे टाकले 

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ Z2, Z4, Z6 आणि Z8 सारख्या 4 ट्रिम लेव्हलच्या एकूण 9 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यांच्या किंमती 11.99 लाख ते 19.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहेत. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एन ची डिलिव्हरी 26 सप्टेंबरपासून सुरू होईल. कंपनीने डिसेंबर 2022 पर्यंत 20,000 लोकांपर्यंत Scorpio-N पोहोचवण्याचे लक्ष ठेवले आहे. मात्र Scorpio-N ची ज्या प्रकारे क्रेझ पाहायला मिळत आहे, ते पाहता Scorpio-N ने कंपनीची  दुसरी कार SUV XUV700 ला वेटिंग पिरिअडमध्ये मागे टाकले आहे. सध्या महिंद्रा स्कॉर्पिओ-N साठी प्रतीक्षा कालावधी 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

इंजिन 

ही SUV 2.0-लीटर Amstallion टर्बो पेट्रोल आणि 2.2 liter mHawk डिझेल या दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिन 200PS कमाल पॉवर आणि 380 Nm चा पीक टॉर्क निर्माण करू शकते, तर डिझेल इंजिन 175PS कमाल पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इन-क्लास शिफ्ट-बाय-केबल तंत्रज्ञानानं सुसज्ज 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायात उपलब्ध असतील.

फीचर्स 

Mahindra Scorpio-N ला 7-इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एअर प्युरिफायर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, प्रीमियम 3D सोनी साउंड सिस्टम, बॉक्सी सिल्हूटसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल फ्रंट बंपर आणि केबिनमध्ये नवीन फ्रंट फॅशिया मिळाला आहे. 18-इंच ड्युअल-टोन अॅलॉय व्हील मोठ्या चाकांच्या कमानीसह ऑफर केले जातात. सुरक्षिततेसाठी, नवीन Scorpio N मध्ये हिल डिसेंट असिस्ट, 6 एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या: 

Mahindra कडून  Scorpio N ऑटोमॅटिक आणि 4WD व्हेरियंटची किंमत जाहीर, जाणून घ्या 
Car : Mahindra Scorpio N की XUV700 कोणती कार सर्वात भारी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget