Honda ची Dio 125 स्कूटर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य
Honda Two-Wheeler : Dio 125 ही स्कूटर 7 कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे.
Honda Two-Wheeler : Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने आपली नवीन स्कूटर Dio 125 स्कूटर भारतीय बाजारात लॉंच केली आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 83,400 रुपये आहे. ही स्कूटर स्टँडर्ड आणि स्मार्ट या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या स्कूटरवर 10 वर्षांची वॉरंटी पॅकेज दिले आहे. या स्कूटरची आणखी कोणती वैशिष्ट्य आहेत ते जाणून घेऊयात.
7 रंगांच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध
Dio 125 ही स्कूटर 7 कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये पर्ल सायरन ब्लू, पर्ल नाईट स्टार ब्लॅक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, स्पोर्ट्स रेड आणि मॅट संगरिया रेड मेटॅलिक या कलरचा समावेश आहे.
स्कूटरचा लूक कसा आहे?
या स्कूटरला आक्रमक दिसणारे हेडलॅम्प आणि ड्युअल आउटलेट मफलरसह क्रोम कव्हर देण्यात आले आहे. याशिवाय यात स्पोर्टी एक्झॉस्ट, नवीन स्प्लिट ग्रॅब रेल, 12-इंच अलॉय व्हील्स आणि नवीन ग्राफिक्ससह वेव्ह डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
स्कूटरची वैशिष्ट्य कोणती?
ही स्कूटर स्मार्ट फाइंड, स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट आणि स्मार्ट की यांसारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. हे स्मार्ट की ECU आणि स्मार्ट की दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जुळलेल्या आयडी म्हणून काम करते, ज्यामुळे चोरी होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय, त्याच्या एच-स्मार्ट व्हेरिएंटमध्ये लॉक मॉड पर्याय देखील उपलब्ध आहे. यामुळे 5 इन 1 फंक्शन चावीशिवाय वापरता येऊ शकते, ज्यामध्ये लॉक हँडल, इग्निशन ऑफ, फ्युएल लिड ओपन, सीट ओपन आणि इग्निशन ऑन सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
याशिवाय, यामध्ये एक संपूर्ण डिजिटल मीटर उपलब्ध आहे, ज्यामध्ये ट्रिप, वॉच, साईड स्टँड इंडिकेटर, स्मार्ट की आणि बॅटरी इंडिकेटर, ईसीओ इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटर देखील दिले आहेत. याशिवाय या स्कूटरमध्ये फ्रंट पॉकेट, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम, पासिंग स्विच यांसारखे फिचर्सही उपलब्ध आहेत. त्याच वेळी, Honda Dio 125 स्कूटरची स्टोरेज क्षमता 18 लीटर आहे.
इंजिन
या स्कूटरमध्ये सायलेंट स्टार्टसह Honda Enhanced Smart Power (ESP) 124 cc OB2-मानक PGM-FI इंजिन आहे.
कंपनीने या स्कूटरमध्ये 12-इंच फ्रंट व्हीलसह टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि थ्री-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन दिले आहे. त्याच वेळी, त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 171 मिमी आहे. ब्रेकिंगसाठी, कॉम्बी-ब्रेक सिस्टीम (सीबीएस) विथ इक्वेलायझर वापरण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :