(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Honda CBR150R : Yamahaला टक्कर देईल Honda ची नवीन CBR150R बाईक, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स, किंमत आणि बरंच काही...
Honda CBR150R : Honda Motorcycle and Scooter India (HMSI) CBR150R एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक भारतात लॉंच करू शकते. त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.
Honda CBR150R Price & Features : Honda Motorcycle and Scooter India (HMSI) CBR150R एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईक भारतात लॉंच करू शकते. त्याच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. ही बाईक लवकरच भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. नवीन CBR150R चे डिझाईन कंपनीच्या मोठ्या CBR मोटारसायकलींपासून प्रेरित असू शकते. ही बाईक लॉंच झाल्यानंतर, Honda CBR 150R थेट Yamaha R15 V4 शी स्पर्धा करू शकते.
काय आहेत Honda CBR150R चे फीचर्स ?
या बाईकच्या पुढील भागात ड्युअल एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल देखील असू शकतात. बाईकच्या इतर प्रमुख फीचर्समध्ये कॉम्पॅक्ट विंडस्क्रीन, स्पोर्टी रीअर-व्ह्यू मिरर, लो-सेट वाइड हँडलबार, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, शिल्पित इंधन टाकी आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश असू शकतो. बाईकला गोल्ड कलरमध्ये USD फ्रंट फोर्क्स देखील मिळू शकतात. ज्यामुळे त्याचा स्पोर्टी लूक आणखी मजबूत होईल. हे व्हिक्टरी ब्लॅक रेड, होंडा रेसिंग रेड, डोमिनेटर मॅट ब्लॅक, कँडी सिंटिलेट रेड सारख्या कलर सीरिजमध्ये ऑफर केले जाऊ शकते.
इंजिनविषयी जाणून घ्या :
नवीन CBR150R 149cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित असू शकते. जे 9,000 rpm वर 16.09 bhp आणि 7,000 rpm वर 13.7 Nm टॉर्क जनरेट करेल. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. ज्याला स्लिप आणि असिस्ट क्लच मिळण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये सिंगल डिस्क वापरली जाऊ शकते.
या बाईकची किंमत नेमकी किती ?
Honda CBR150R ची अंदाजे किंमत सुमारे 1.60 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. त्याची थेट स्पर्धा यामाहाच्या R15 शी होईल. दोन्ही बाईक जवळपास समान किंमतीच्या श्रेणीत असू शकतात. त्यांची रचना देखील एकमेकांना स्पर्धा देण्यासारखीच आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jeep Meridian SUV : ठरलं! 7-सीटर जीप मेरिडियन 2022मध्ये भारतात लाँच होणार! जाणून घ्या खास फीचर्स
- Kia Careens : कियाची 7 सीटर कारेन्स उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या पाच टॉप फीचर्सबद्दल
- EV : जबरदस्त! अमेरिकेत होणार 'इलेक्ट्रिक रोड'! ज्यावर चालत्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्ज होणार, भारतातही शक्य होणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha