(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0: जबरदस्त! हिरोची स्पेशल एडिशन बाईक लॉन्च, लूकसह फीचर्सही आहेत दमदार
Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतात आपली स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केली आहे. हिरोने Xtreme 160R Stealth Edition 2.0 लॉन्च केला आहे.
Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतात आपली स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केली आहे. हिरोने Xtreme 160R Stealth Edition 2.0 लॉन्च केला आहे. कंपनीने ही बाईक भारतीय बाजारपेठेत 1.30 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीत उतरवली आहे. या नवीन एडिशनमध्ये Hero Xtreme 160R ला मॅट ब्लॅक पेंटसह लाल इन्सर्टमध्ये सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे या बाईकला अतिशय स्टाइलिश आणि स्पोर्टी लूक मिळतो.
Xtreme 160R Stealth Edition 2.0 ही डिझाइनच्या बाबतीत आपल्या स्टॅंडर्ड व्हेरिएंट सारखीच आहे. बाईकच्या टेलिस्कोपिक फॉर्क्स, हेडलाइट काउल, फ्रेम आणि पिलियन ग्रॅब रेलमध्ये लाल अॅक्सेंटसह या बाईकला अधिक प्रीमियम लूक देतो. या बाईकला नकल गार्ड देखील देण्यात आला आहे. स्टँडर्ड मॉडेलप्रमाणेच नवीन स्टील्थ एडिशनमध्येही कंपनीने सर्व लाइटिंग LED मध्ये दिली आहे. याशिवाय बाईकला अॅडजस्टेबल ब्राइटनेससह एक एलसीडी डिस्प्ले, पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन युनिट देखील मिळते.
इंजिन आणि पॉवर
ही बाईक सिंगल डिस्क, ड्युअल डिस्क आणि स्टेल्थ एडिशन या तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या नवीन बाईकमध्ये 163cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आला आहे. जे 8,500rpm वर 15bhp पॉवर आणि 6,500rpm वर 14Nm पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. हे बाईक अनुक्रमे 100/80 आणि 130/70 सेक्शनच्या पुढील आणि मागील टायरसह 17-इंच चाकांवर चालते. सिंगल डिस्क व्हेरिएंटचे कर्ब वेट 138.5 किलो आहे. तर ड्युअल डिस्क मॉडेलचे वजन 139.5 किलो आहे.
कंपनी आपल्या या नवीन बाईकमध्ये 12-लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे. ही बाईक 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात एक्स्ट्रीम स्टेल्थ एडिशन (ब्लॅक), पर्ल सिल्व्हर व्हाइट, व्हायब्रंट ब्लू, स्पोर्ट्स रेड आणि 100 मिलियन लिमिटेड एडिशन (लाल आणि पांढरा) रंगाचा समावेश आहे. सिंगल डिस्क व्हर्जनमध्ये ड्रम ब्रेक सेटअप मागील बाजूस वापरण्यात आला आहे. तसेच ड्युअल डिस्क ब्रेक प्रकार आणि स्टील्थ एडिशनला दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक मिळतात. सुरक्षेसाठी ही बाईक सिंगल चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. जे पुढच्या चाकाला देण्यात आले आहे.