एक्स्प्लोर

Hero Super Splendor XTEC भारतात लॉन्च, दिसायला दमदार फीचर्सही शानदार

Hero Super Splendor XTEC launched: प्रसिद्ध दुचाकी निर्माता ​​Hero Motocorp ने आपल्या बाईक रेंज वाढवत सुपर स्प्लेंडरचा XTEC प्रकार लॉन्च केला आहे. सुपर स्प्लेंडर Xtec नवीन डिझाइनमध्ये सादर करण्यात आली आहे.

Hero Super Splendor XTEC launched: प्रसिद्ध दुचाकी निर्माता ​​Hero Motocorp ने आपल्या बाईक रेंज वाढवत सुपर स्प्लेंडरचा XTEC प्रकार लॉन्च केला आहे. सुपर स्प्लेंडर Xtec नवीन डिझाइनमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने या बाईकचा ड्रम व्हेरिएंट 83,368 रुपये एक्स-शोरूम आणि डिस्क व्हेरिएंट 87,268 रुपये लॉन्च केला आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. तसेच दिसायलाही बाईक खूप स्टायलिश आहे. या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... 

हीरो मोटोकॉर्पचे म्हणणे आहे की, तरुण ग्राहकांच्या मागणीनुसार ही बाईक अपडेट करण्यात आली आहे. सोयीसाठी कंपनी या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जिंग सारखे फीचर्स दिले आहे. याशिवाय बाईक पूर्ण एलईडी हेडलाइट, संपूर्ण डिजिटल डिस्प्ले आणि नवीन डिझाइन टर्न इंडिकेटरसह सादर करण्यात आली आहे. बाईकच्या डिजिटल डिस्प्लेवर फुल डिजिटल स्पीडोमीटर, फ्युएल इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि  मालफंक्शन इंडिकेटर देण्यात आले आहेत. याशिवाय बाईकच्या डिस्प्लेवर एसएमएस आणि कॉल अलर्टही उपलब्ध आहेत. आता बाईकमध्ये साइड स्टँड कटऑफ स्विचही दिला जात आहे.

सुपर स्प्लेंडर Xtec मध्ये कंपनीने स्टाइलिंग वाढवण्यासाठी नवीन स्टिकर्स वापरले आहेत, ज्यामुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश दिसते. कंपनीने बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सुपर स्प्लेंडर Xtec कंपनीच्या स्टार्ट-स्टॉप i3S तंत्रज्ञानासह देखील येते.

Hero Super Splendor XTEC launched: इंजिन 

ही बाईक पूर्वीप्रमाणेच 125cc सिंगल सिलेंडर BS-6 इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन 10.7 Bhp ची कमाल पॉवर आणि 10.6 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की Hero Super Splendor Xtech 68 km/l मायलेज देईल. कंपनीने नवीन OBD-2 नुसार इंजिन अपडेट केले आहे. Hero Super Splendor Xtec ला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्कसह डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग सस्पेंशनसह ड्रम ब्रेक मिळतो. या बाईकचे ब्रेक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमने (CBS) सुसज्ज आहेत, जे सर्व 125cc बाईकसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

Keeway V-Cruise 125 बाईक लॉन्च

हंगर्स वाहन उत्पादक ब्रँड Keyway ने भारतीय बाजारपेठेत आपली बाईक लॉन्च केली आहे. Keyway ने AARI (आदिश्वर ऑटो राइड इंडिया) द्वारे भारतात आपल्या बाईक लॉन्च केल्या, जे Benelli, QJ आणि Moto Morini सारख्या ब्रँडच्या बाईक देखील विकते. याबाईकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. Keyway ने V-Cruise 125 नावाने ही नवीन 125cc बाईक लॉन्च केली आहे. V-ट्विन इंजिन असलेली ही 125cc क्रूझर बाईक आहे. Keyway V-Cruise 125 ही चीनी अपस्टार्ट कंपनीची रीबॅज केलेली बेंडा बाईक आहे. नवीन Keyway V-Cruise 125 बाईक भारतात 3.89 लाख रुपयांना लॉन्च करण्यात आली आहे. Benda ची V-Cruise 125 निवडक बाजारपेठांमध्ये Keyway V-Cruise 125 या नावाने लॉन्च करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget