बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक
Upcoming Royal Enfield Bikes 2022: Royal Enfield बाईकची भारताच्या तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेज आहे. भारतात आजही अनेक बाईक प्रेमींचं पाहिलं क्रश हे Royal Enfield आहे.
Upcoming Royal Enfield Bikes 2022: Royal Enfield बाईकची भारताच्या तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेज आहे. भारतात आजही अनेक बाईक प्रेमींचं पाहिलं क्रश हे Royal Enfield आहे. अशातच आता बुलेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गच दुचाकी निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच भारतात आपल्या नवीन सहा बाईक्स लॉन्च करणार आहे. कंपनी या बाईकच्या डेव्हलपमेंटवर काम करत आहे. यातील काही बाईक टेस्टिंग दरम्यान दिसल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून कंपनी बाईक बाजारात आपला विस्तार करण्यासाठी काम आहे करत आहे. अलीकडेच कंपनीने Royal Enfield Classic 350 चा अपडेटेड मॉडेल लॉन्च केला होता आणि त्याआधी Royal Enfield Thunderbird ही बाजारात उतरवली होती. आता आपल्या नवीन बाईक्ससह कंपनी भारतीय बाजारपेठेत नवीन धमाका करण्यास सज्ज झाली आहे.
रॉयल एनफिल्ड कंपनी भारतात एक-दोन नव्हे तर एकूण 6 नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये शॉटगन 650 रोडस्टर (Shotgun 650 Roadster) ते रॉयल एनफिल्ड हंटर (Royal Enfield Hunter) सारख्या पॉवरफुल बाईकचा समावेश आहे. ऑगस्ट 2022 मध्ये कंपनी रॉयल एनफील्ड हंटर लाँच करू शकते, जी टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. कंपनीची बहुचर्चित बाईक बुलेट 350 देखील अपडेट करण्यात आली आहे. जी आता लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने गेल्या वर्षी Royal Enfield Classic 350 अपडेट केले होते. त्यानंतर बुलेटमध्ये कोणतेही अपडेट पाहायला मिळाले नाही.
कंपनीचं विशेष लक्ष आपल्याहिमालयन 450 सारख्या पॉवरफुल बाईकवर देखील आहे. नवीन हिमालयन 450 बाईकमध्ये तुम्हाला 450cc चा सिंगल इंजिन सिलेंडर पाहायला मिळेल. जे 40ps पॉवर आणि 45Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हिमालयन बाईक व्यतिरिक्त, रॉयल एनफील्ड कंपनी Enfield Super Meteor 650 लाँच करण्याबद्दल खूप उत्सुक आहे. Royal Enfield Super Meteor 650 बाईक देखील कंपनीने अपडेट केली आहे. ज्यामध्ये 650cc चे इंजिन मिळेल. ही बाईक 2022 च्या अखेरीस पाहायला मिळेल.