एक्स्प्लोर

Electric Scooter Fire: खराब बॅटरी कूलिंग सिस्टीममुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग, माहिती आली समोर

Electric Scooter Fire: इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी तज्ज्ञांच्या पथकाला याचे कारण सापडले आहे.

Electric Scooter Fire: इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी तज्ज्ञांच्या पथकाला याचे कारण सापडले आहे. तज्ज्ञांच्या या पथकाने आपल्या अहवालात खुलासा केला आहे की, आग लागलेल्या जवळपास सर्व स्कूटरच्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टममध्ये दोष आढळून आले आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या डब्यात कूलिंग किंवा व्हेंट सिस्टम नसते. ज्यामुळे बॅटरीचे तापमान कमी ठेवण्यासाठी आवश्यक वेंटिलेशन होत नाही आहे.

या अहवालात पुढे म्हटले आहे की, बॅटरीच्या डब्यात वेंटिलेशन नसल्यामुळे, बॅटरीमधील काही घटक जास्त गरम होतात आणि जळू लागतात, हे स्कूटरला आग लागण्याचे मुख्य कारण आहे. या पथकाने असेही म्हटले आहे की, अनेक ब्रँड त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना किमान अग्निसुरक्षा देत आहेत आणि वाहनांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी खर्चात कपात करत आहेत.

हा तपासाचा प्राथमिक अहवाल असून येत्या काही दिवसांत अंतिम अहवाल सरकारला सादर केला जाईल, असे पथकाने सांगितले आहे. सरकारने तज्ज्ञांच्या पथकाच्या शिफारशी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांसोबत शेअर केल्या आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल केला आहे.

ई-वाहनांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील

गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्यांना मोठा दंड ठोठावला जाईल आणि इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्यास सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेश दिले जातील, असा इशारा दिला होता. परिवहन मंत्रालय लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणण्यासाठी सज्ज आहे. जी ऑगस्ट 2022 मध्ये जारी केली जाईल.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget