Electric Bike Update : 'या' कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलच्या किंमती 10,000 रुपयांनी कमी केल्या; नवीन अपडेट्स वाचा
Electric Bike Update : ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सची लोकप्रिय स्कूटर ट्रॉटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपयांवरून 94,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
Electric Bike Update : Odyssey Electric या भारतातील प्रिमियम आणि मिड-रेंज इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी लोकप्रिय कंपनी, तिच्या संपूर्ण रेंजमधील इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिसी इलेक्ट्रिक या बाईकमधील कपात तात्काळ प्रभावाने लागू झाली असून ग्राहक 31 मार्चपर्यंत याचा लाभ घेऊ शकतात.
सर्वांसाठी इलेक्ट्रिक वाहतूक सुलभ बनवण्याच्या आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी सोल्यूशन्स अधिक आकर्षक आणि परवडणारे बनवण्याच्या दृष्टिकोनातून, Odyssey Vehicles Private Limited ने बॅटरीच्या घसरलेल्या किमतींच्या अनुषंगाने त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.
या कारच्या जुन्या आणि नवीन व्हेरिएंटच्या किंमतीत कोणते बदल करण्यात आले?
ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या लोकप्रिय स्कूटरच्या जुन्या आणि नवीन किमतींबद्दल सांगायचे झाल्यास, e2Go Lite स्कूटरची किंमत आधी 71,100 रुपये होती आणि आता त्याची किंमत 69,999 रुपये झाली आहे. त्याच वेळी, e2Go Plus स्कूटरची किंमत 81,400 रुपयांवरून 78,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. e2Go Graphene ची एक्स-शोरूम किंमत 63,650 रुपयांवरून 62,650 रुपये झाली आहे. त्याच वेळी, V2 स्कूटरची किंमत 77,250 रुपयांवरून 76,250 रुपये आणि V2 प्लस मॉडेलची किंमत 100,450 रुपयांवरून 98,450 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सची लोकप्रिय स्कूटर ट्रॉटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपयांवरून 94,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. त्याच वेळी, Odyssey Racer Lite ची किंमत 85,000 रुपयांवरून 77,500 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Racer Pro ची किंमत 1,11,500 रुपयांवरून 1,01,500 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Hawk Lite मॉडेलची किंमत 99,400 रुपयांवरून 96,900 रुपये आणि Hawk Plus मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1,17,950 रुपयांवरून 1,10,950 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
Odyssey इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या नवीन किमतींबद्दल बोलायचे झाले तर, जिथे Evokis मॉडेलची किंमत आधी 1,71,250 रुपये होती, ती आता 1,66,000 रुपये झाली आहे. त्याच वेळी, वेडरची किंमत 1,61,574 रुपयांवरून 1,56,574 रुपयांवर घसरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Mahindra Thar Earth Edition भारतीय बाजारात 15.40 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च; 'ही' असतील खास वैशिष्ट्य