E vehicle : मिशन ग्रीन मोबिलिटी... औरंगाबादमध्ये ई व्हेईकल खरेदी करण्याचा नवा विक्रम!
Aurangabad E vehicle : एकाच वेळी दीडशे मर्सिडीज औरंगाबादकरांनी खरेदी केल्या आणि याची चर्चा जगभर झाली. आता एकाच वेळी 101 इलेक्ट्रिक चार चाकी गाड्या विकत घेत नवा विक्रम केला आहे.
Aurangabad E vehicle औरंगाबाद : उद्योग नगरी आणि पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादमध्ये एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केला होता. यामुळं औरंगाबादची वेगळी ओळख जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली. याच ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आता एकाच वेळी जवळपास 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा विक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे. काल यातील 101 गाड्या औरंगाबादकरांना वितरित करण्यात आल्या.
एकाच वेळी दीडशे मर्सिडीज औरंगाबादकरांनी खरेदी केल्या आणि याची चर्चा जगभर झाली. आता एकाच वेळी 101 इलेक्ट्रिक चार चाकी गाड्या विकत घेत नवा विक्रम केला आहे. पर्यावरणपूरक अशा ई व्हेईकल खरेदी करण्याचा मुख्य उद्देश आहे मिशन ग्रीन मोबिलीटी.
औरंगाबादमध्ये उद्योजक केवळ चार चाकी वाहनंच नाही तर इलेक्ट्रिकलची वेगवेगळी वाहनं खरेदी करणार आहेत. यामध्ये बस, टू व्हीलर, तीन चाकी गाड्यांचा देखील समावेश आहे. यात 1 हजार ई टू व्हीलर, 500 तीन चाकी मालवाहू आणि प्रवासी गाड्या, 250 वेगवेगळ्या कंपन्यांच्या फोर व्हीलर आणि 50 बसचा समावेश आहे.
देशात ई व्हेईकल वाढाव्यात म्हणून इलेक्ट्रिकल वाहनांना देण्यात येणारी सबसिडीची योजना मार्चच्या शेवटापर्यंत वाढविण्यात आली आहे. वाहन खरेदी करण्याबाबत बँकांकडून काही कर्ज उपलब्ध करून देता येतेय का? याबाबतची चाचपणी सुरू असून काही बँका कर्ज देण्यासाठी देखील तयार आहेत. औरंगाबाद येथील उद्योजकांनी केलेला हा विक्रम औरंगाबाद पुरता मर्यादित नाही तर मराठवाड्यातही पोहोचवायचा आहे.
औरंगाबाद शहराने अनेकदा सामुहिक प्रयत्नातून आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद आणि मराठवाडा विभागातील जबाबदार नागरिक आपले शहर स्मार्ट बनविण्याच्या दिशेने छोट्या पावलांसह शहरांमध्ये स्वच्छ आणि हरित आपले योगदान देऊ इच्छित आहेत हे विशेष.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- World Coronavirus : कोरोनाची नवी लाट! चीनमध्ये लॉकडाऊन, तर रशियात सर्वाधिक मृत्यू; जगभरात 6 कोटी सक्रिय रुग्ण
- Coronavirus Updates : कोरोना महामारीचा अंत जाहीर होणार? WHO कडून तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha