Best vogo Electric Bike: बेस्ट गिफ्ट! संपूर्ण मुंबईत सुरू होणार ई-बाईक सेवा, प्रति किमी फक्त 3 रुपये भाडे
Mumbai Best vogo Electric Bike: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईत ई-बाईक सेवा सुरू होणार आहे, अशी घोषणा बेस्टकडून करण्यात आली आहे. यामुळे आता बसमधून उतरणारे प्रवासी त्याच्या गंतव्यस्थानावर जाण्या येण्यासाठी या ई-बाईक सेवेचा वापर करू शकतात.
Mumbai Best vogo Electric Bike: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईत ई-बाईक सेवा सुरू होणार आहे, अशी घोषणा बेस्टकडून करण्यात आली आहे. यामुळे आता बसमधून उतरणारे प्रवासी त्याच्या गंतव्यस्थानावर जाण्या येण्यासाठी या ई-बाईक सेवेचा वापर करू शकतात. बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये 180 बस थांब्यांवर व्यावसायिक तसेच निवासी भागात 1000 ई-बाईक तैनात केल्या जाणार आहेत.
बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या ई-बाईक्स मुंबईमध्ये अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, खार, वांद्रे माहीम आणि दादर येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. नंतर शहराच्या उर्वरित भागांत त्यांचा विस्तार केला जाईल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. जून 2023 पर्यंत 5,000 ई-बाईक सेवेत आणण्याचं बेस्टचं लक्ष आहे. लवकरच ही सेवा बेस्ट चलो अॅपसोबत संलग्न केली जाणार आहे.
ई-बाईकचे प्रवाशांना काय होणार फायदे
1. व्यावसायिक आणि निवासी भागात प्रमुख बस थांब्यांवर व्यवस्था
2. अत्यंत परवडणारे भाडे. मूळ भाडे फक्त 20 रुपये, प्रति किमी प्रवासासाठी 3 रुपये आणि 1.50 रुपये प्रति मिनिट.
3. सुरक्षित वेग. शहरातील प्रवासांसाठी अत्यंत सुरक्षित असा 15 किमी प्रति तास पर्यंत मर्यादित आहे.
4. वायू किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही. ई-बाईक कोणत्याही प्रकारचे वायू किंवा ध्वनी प्रदूषण करत नाहीत.
5. गर्दी कमी असलेल्या रस्त्यावरील प्रत्येकासाठी जलद प्रवास.
ई-बाईक चालवण्यासाठी परवान्याची आवश्यक नाही
दरम्यान, बेस्ट कडून सेवेत आणल्या जाणाऱ्या या ई-बाईक वोगो कंपनीच्या आहेत. या बाईकची गती कमी असल्याने याला चालवण्यासाठी चालक परवान्याची आवश्यक नाही. या बाईकचा लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे. तसेच ही बाईक गिअरलेस आहे. तुम्हाला जर सायकल चालवता येत असेल, तर तुम्ही काही मिनिटातच ही बाईक चालवायला शिकू शकतो. बाईक अनलॉक करण्यासाठी आणि चालवण्यासाठी Voga या वापर आणि नंतर फेरी संपल्यानंतर त्यांना पुन्हा लॉक करता येईल. चलो अॅपच्या माध्यमातून तुम्ही ही बाईक भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्ही ओनलाईन युपीआयच्या माध्यमातून भाडयाची रक्कम देऊ शकता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tata Tiago EV आली, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार हे फीचर्स, जाणून घ्या किंमत
Tata Tiago EV भारतात 8.49 लाखांच्या किंमतीत लॉन्च, या आहेत 10 महत्वाच्या गोष्टी