ऋतुराज गायकवाडने खरेदी केली नवीन बाईक; जबरदस्त फीचर्सने आहे सुसज्ज, जाणून घ्या किती आहे किंमत
Cricketer Ruturaj Gaikwad New Bike: ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय क्रिकेट संघातील एक लोकप्रिय नाव आहे. ऋतुराज गायकवाडने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये काही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Cricketer Ruturaj Gaikwad New Bike: ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय क्रिकेट संघातील एक लोकप्रिय नाव आहे. ऋतुराज गायकवाडने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये काही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र ऋतुराज गायकवाड हा देखील बाईकचा शौकीन असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने जावा बाईकपैकी एक सर्वोत्तम बाईक खरेदी केली आहे. या क्रिकेटपटूने आता त्याच्या गॅरेजमध्ये आत आणखी एक बाईक जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) उभी केली आहे. याची किंमत 2,09,187 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
टीम इंडियासाठी त्याचा शेवटचा सामना या ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात होता. गायकवाड आयपीएलच्या मागील तीन हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडूनही खेळला आहे. तसेच ऋतुराज गायकवाडने गेल्या महिन्यात विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रम केला होता.
टीम इंडियासाठी त्याचा शेवटचा सामना या ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात होता. गायकवाड आयपीएलच्या (IPL) मागील तीन हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडूनही (Chennai Super Kings) खेळला आहे. तसेच ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) गेल्या महिन्यात विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रम केला होता. हा सामना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात झाला ज्यात गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये सात सिक्स ठोकले होते. गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अलीकडेच मूनस्टोन पांढऱ्या रंगात नवीन जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) खरेदी केली आहे.
Cricketer Ruturaj Gaikwad New Bike: किंमत आणि इंजिन
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.07 लाख रुपये आहे. जुन्या पेराक नंतर 42 बॉबर (Jawa 42 Bobber) हे जावाचे दुसरे असे मॉडेल आहे आणि देशातील विक्रीसाठी सर्वात स्वस्त फॅक्टरी-निर्मित बॉबर आहे. रोडस्टरच्या तुलनेत स्टाइलिंगमध्ये अनेक बदल असले तरी 42 बॉबर मानक 42 वर आधारित आहे. राइडिंग एर्गोनॉमिक्ससाठी लोअर सेट फ्लोटिंग सिंगल सीट उपलब्ध आहे. तसेच फॅटर टायर आणि कमीतकमी बॉडीवर्क, फॉरवर्ड सेट फूट पेग आणि नवीन हँडलबारसह बदलले. मानक 42 हुन हटके 42 बॉबरला पेराकला मोठे इंजिन देण्यात आले आहे. मोटर 30.2 bhp आणि 32.74 Nm टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड गिअरबॉक्स मिळवते. तसेच ड्युअल चॅनल ABS मानक आहे.