Car Sales August 2022: टाटाच्या वाहनांची वाढली मागणी, ऑगस्टमध्ये केली 78,843 युनिट्सची विक्री
Car Sales August 2022: टाटा मोटर्सच्या ऑगस्टमधील विक्रीची माहिती समोर आली असून कंपनीने 78,843 वाहनांची विक्री केली आहे. टाटा मोटर्सने ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या 47,166 युनिट्सची विक्री केली.
Car Sales August 2022: टाटा मोटर्सच्या ऑगस्टमधील विक्रीची माहिती समोर आली असून कंपनीने 78,843 वाहनांची विक्री केली आहे. टाटा मोटर्सने ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या 47,166 युनिट्सची विक्री केली. ज्यामध्ये 43,321 युनिट्स ICE आणि 3,845 युनिट्स इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. तसेच कंपनीने 31,492 व्यावसायिक वाहनांची विक्री केली आहे.
टाटा मोटर्सने ऑगस्ट 2021 च्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये विक्रीत 36% वाढ नोंदवली आहे. ICE पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत 60% आणि EV पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत 276% ची वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत 76,479 वाहनांची विक्री केली आहे. ज्यात प्रवासी तसेच व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. ऑगस्ट 2021 च्या तुलनेत त्यात 41% वाढ नोंदवली गेली आहे.
व्यावसायिक वाहनांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑगस्ट महिन्यात एकूण 31,492 वाहनांची विक्री झाली आहे. जी गेल्या ऑगस्टच्या 29,781 युनिटच्या तुलनेत 6% वाढली आहे. यातील 29,313 मोटारींची देशांतर्गत बाजारात विक्री झाली असून 2,179 मोटारींची निर्यात झाली आहे. कंपनीसाठी गेले काही महिने चांगले गेले असून कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत वाढत झाली आहे.
कंपनीने ऑगस्ट महिन्यात 43,321 युनिट्सची विक्री केली आहे. जी मागील ऑगस्टमध्ये 26,996 युनिट्सच्या तुलनेत 60% वाढली आहे. तर इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांच्या 3845 युनिट्सची विक्री झाली आहे. जी गेल्या ऑगस्टमध्ये विकल्या गेलेल्या 1022 युनिटच्या तुलनेत होती आणि 276% वाढ नोंदवली गेली आहे. जी इलेक्ट्रिक वाहनांच्या दृष्टीने मोठी वाढ आहे. यासह टाटा मोटर्सने एसयूव्ही सेगमेंटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात नेक्सन आणि पंचची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री केली असून, अनुक्रमे 15,085 युनिट्स आणि 12,006 युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीची Nexon ही गेल्या काही महिन्यांपासून देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV राहिली आहे.
टाटा मोटर्सला भारतीय बाजारपेठेतील एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे. कंपनी आगामी काळात अनेक नवीन एसयूव्ही आणणार आहे. तसेच सध्याच्या मॉडेल्सचा विस्तार करणार आहे. जेणेकरून टाटा मोटर्स एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवू शकेल. कंपनी सध्या पंच, नेक्सन, हॅरियर आणि सफारी विकते. नेक्सन ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. टाटा मोटर्सला एसयूव्ही सेगमेंटमध्ये यश मिळाले असून कंपनीच्या नवीन एसयूव्ही पंचलाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. कंपनीच्या SUV विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. पण त्याचवेळी कंपनीला प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.