(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cars on Discount: कंपन्या जुना स्टॉक करत आहेत रिकामा, या गाड्यांवर मिळत आहे भरघोस सूट
Discount on 2022 Model Cars: मागील वर्षी तुम्हाला एखादी कार आवडली असले, मात्र कमी बजेटमुळे तुम्हाला ती खरेही करता आली नसेल, तर या नवीन वर्षात तुम्हाला नवीन कार खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
Discount on 2022 Model Cars: मागील वर्षी तुम्हाला एखादी कार आवडली असले, मात्र कमी बजेटमुळे तुम्हाला ती खरेही करता आली नसेल, तर या नवीन वर्षात तुम्हाला नवीन कार खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. कारण या महिन्यात अनेक कार उत्पादक 2022 मॉडेलच्या न विकल्या गेलेल्या कारवर भरघोस सूट देत आहेत. स्टॉक टिकेपर्यंतच या ऑफरचा लाभ दिला जाईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, ज्यावर तुम्ही या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. कारवरील या सवलतीच्या ऑफर शहर, डीलर आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतात.
जीप मेरिडियन
2022 मध्ये बनवलेल्या जीपच्या या थ्री-रो एसयूव्हीच्या काही निवडक प्रकारांवर 3 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जीप मेरिडियन फक्त डिझेल इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. ही कार बाजारपेठेतील एमजी ग्लोस्टर आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
स्कोडा कुशाक
Skoda Kushaq च्या खरेदीवर तुम्ही 1.25 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. कुशक ही देशातील सर्वात सुरक्षित कार आहे. ही कार Volkswagen Tiguan सारखीच आहे. ही कार Hyundai Creta, Kia Seltos, Toyota Urban Cruiser Hyryder सारख्या कारशी स्पर्धा करते.
Citroen C5 Aircross
Citroen C5 Aircross हे कंपनीचे भारतातील पहिले उत्पादन आहे, जी एक प्रीमियम SUV आहे. C5 Aircross फक्त डिझेल इंजिनसह येते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. ही कार कंपनीच्या काही आउटलेटवर 2 लाख रुपयांच्या सवलतीत खरेदी केली जाऊ शकते. ही कार Volkswagen Tiguan, Hyundai Tucson आणि Jeep Compass यांच्याशी स्पर्धा करते.
जीप कंपास डिझेल
जीपमधील या 5-सीटरमध्ये 4WD तंत्रज्ञान आणि पॉवरफुल डिझेल इंजिन आहे. डिझेल व्हेरिएंटसह कंपासच्या खरेदीवर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही कार 6-स्पीड मॅन्युअल आणि 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
टाटा हॅरियर
टाटाची ही स्टायलिश मध्यम आकाराची SUV एक आलिशान इंटीरियर केबिन, ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह भरपूर सुरक्षा आणि ताकद देते. या कारच्या 2022 मॉडेलच्या डिझेल व्हेरिएंटच्या खरेदीवर 1.2 लाख रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. लवकरच या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात येणार आहे.
Volkswagen Tiguan
Volkswagen Tiguan ही देशातील सर्वात आलिशान, सुरक्षित आणि मजबूत कार मानली जाते. या कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. या कारच्या 2022 मॉडेलच्या स्टॉकवर 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. भारतीय बाजारपेठेत, Taigun ची स्पर्धा Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara आणि Skoda Kushaq सारख्या कारशी आहे.