(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईहून गोवा एका चार्जमध्ये गाठाल; Kia EV6 ची बुकिंग सुरू, भारतात फक्त 100 युनिट्सची होणार विक्री
Kia Ev6 Booking In India: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या kia ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची बुकिंग भारतात सुरू केली आहे.
Kia Ev6 Booking In India: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या kia ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची बुकिंग भारतात सुरू केली आहे. EV6 अगदी नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे. कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भारतात विकणार फक्त 100 युनिट्स
Kia EV6 चे फक्त 100 युनिट भारतात कम्प्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून येतील आणि या वर्षापासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असतील. ही इंपोर्टेड कार पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार आहे.
अशी बुक करता येईल ही कार
ग्राहक Kia EV6 फक्त 3 लाख रुपयांच्या टोकन रक्कमेसह बुक करू शकतात. ही इलेक्ट्रिक कार केवळ 12 शहरांमधील 15 निवडक डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते. तसेच ही कार ग्राहक किया इंडियाच्या वेबसाइटद्वारे देखील बुक करू शकता. किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ Tae-Jin Park यांनी सांगितले की, भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात मोठे बदल होत आहेत. या बदलांमध्ये Kia आघाडीवर आहे. भारतीय नागरिकांच्या अपुर्या गरजा पूर्ण करणाऱ्या आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन आणि सेवांद्वारे आम्ही हे वारंवार सिद्ध केले आहे.
Kia EV6 पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स
पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Kia EV6 सिंगल चार्जवर 528 किमी पर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ही इलेक्ट्रिक कार केवळ 5.2 सेकंदात 0-100 किमी / ताशी वेग पकडू शकते. चार्जिंग वेळेबद्दल सांगायचे तर, ही इलेक्ट्रिक कार 350KWh चार्जर वापरून 18 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.
फीचर्स
Kia EV6 ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टिम, पॅनोरामिक सनरूफ, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फॉरवर्ड कोलिजन अव्हायडन्स असिस्ट, लेन कीप असिस्ट सिस्टम आणि 60 हून अधिक कनेक्ट फीचर्स यात देण्यात आले आहेत.
संबंधित बातमी:
Review: एक चार्जमध्ये गाठते 500 किमीचा पल्ला; Kia EV6 बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती