BMW 2 Series Performance Edition : BMW ने लॉन्च केली 2 Series M Performance Edition; किंमत 46 लाख रूपये
BMW 2 Series Performance Edition Launched : कारची किंमत 46 लाख रुपये आहे, जी 220i M स्पोर्ट प्रो आणि 220d M स्पोर्ट ट्रिमपेक्षा 50,000 रुपये जास्त आहे.
BMW 2 Series Performance Edition Launched : दिग्गज कार कंपनी BMW इंडियाने ने नुकतीच भारतात 2 सीरीज ग्रॅन कूप एम परफॉर्मन्स एडिशन लाँच केले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 46 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर BMW ग्रुप प्लांट चेन्नई येथे उत्पादित, मर्यादित व्हर्जन केवळ BMW ऑनलाईन शॉपवर उपलब्ध आहे. हे 220i M Sport Pro ट्रिमपेक्षा 50,000 रुपये महाग आहे. एम परफॉर्मन्स एडिशन फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे आणि हे मर्यादित एडिशन मॉडेल आहे.
BMW 2 सिरीज M परफॉर्मन्स एडिशन
BMW 2 सिरीज M परफॉर्मन्स एडिशन फक्त सॅफायर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे, ज्याचे इंटीरियर ब्लॅक आणि बेज कलरमध्ये दिलेले आहे. स्पेशल एडिशनमध्ये ग्रिल, ड्राईव्ह सिलेक्टर, बॅज आणि पुडल लॅम्प्स सारखे M परफॉर्मन्स पार्ट्स मिळतात. समोरचा बंपर तसेच ग्रिल आणि विंग मिररमधील इन्सर्टला सेरिअम ग्रे कलर मिळतो.
BMW 2 Series कारची वैशिष्ट्ये आणि तपशील
BMW 2 Series या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, 2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशनमध्ये दोन 10.25-इंच डिस्प्ले देण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये वायरलेस चार्जर, हेड-अप डिस्प्ले, रिव्हर्स कॅमेरा आणि 10-स्पीकर ध्वनी प्रणाली देखील समाविष्ट आहे. यात मानक म्हणून सहा एअरबॅग, सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट, EBD सह ABS, ISOFIX अँकर आणि रन-फ्लॅट टायर्स मिळतात.
पॉवरट्रेन
BMW 2 Series M Performance Edition मध्ये फक्त 2.0-लिटर, चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते, जे 179 hp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार फक्त 7.1 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
किंमत किती आणि स्पर्धा कोणाशी करणार?
BMW 2 Series या कारची किंमत 46 लाख रुपये आहे, जी 220i M स्पोर्ट प्रो आणि 220d M स्पोर्ट ट्रिमपेक्षा 50,000 रुपये जास्त आहे आणि 220i M स्पोर्ट ट्रिमपेक्षा 2.5 लाख रुपये जास्त आहे. स्टँडर्ड 2 सीरीजची एक्स-शोरूम किंमत 43.50 लाख ते 45.50 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्याची स्पर्धा मर्सिडीज-बेंझ ए-क्लास लिमोझिनशी आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 45.80 लाख रुपये आहे.
MG Astor Blackstorm Edition कार भारतात लाँच; दमदार इंजिन आणि आकर्षक लूकसह मिळतील 'ही' वैशिष्ट्य