(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMW ने लॉन्च केली स्पेशल एडिशन कार, फक्त 10 युनिट्सची करणार विक्री
BMW India ने भारतात आपली स्पेशल एडिशन कार लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त देशात 5 सिरीज 50 Jahre M Edition लॉन्च केली आहे.
BMW India ने भारतात आपली स्पेशल एडिशन कार लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त देशात 5 सिरीज 50 Jahre M Edition लॉन्च केली आहे. याची प्रारंभिक किंमत 67.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. BMW 530i M Sport 50 Jahre M Edition ही पेट्रोल इंजिनसह येते आणि कंपनीच्या चेन्नई प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर याचे उत्पादन केले जात आहे. कंपनीने या खास मॉडेलसाठी ऑनलाइन बुकिंगही सुरू केली आहे. या कारचे फक्त 10 युनिट्स विकले जातील.
इंजिन आणि स्पीड
BMW 5 सिरीज '50 Jahre M Edition' मॉडेलला TwinPower Turbo तंत्रज्ञान मिळते. यासह कारचे 2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन 252 एचपी आउटपुट आणि 350 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 6.1 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते.
याच्या बाहेरील लूकच्या बाबतीत BMW 5 सिरीज 50 Jahre M Edition ला ऑल-ब्लॅक किडनी ग्रिल आणि अलॉय व्हील्ससह स्पोर्टियर डिझाइन मिळते. किडनी ग्रिलच्या वर '50 इयर्स ऑफ एम' डोअर प्रोजेक्टर असलेले प्रतिकात्मक M चिन्ह आहे. हे रेसिंग टच असलेल्या क्लासिक BMW मोटरस्पोर्ट लोगोपासून प्रेरित आहेत. कारच्याच्या पुढील आणि मागील लोगोवर तसेच व्हील हब कॅपवर M चिन्ह दिले आहे. याच्या आतील भागात ड्रायव्हर-केंद्रित कॉकपिट आहे. कारच्या स्पोर्ट्स सीट्सना लेदर कव्हर्स आणि सीट बेल्ट एम कलरमध्ये स्टिचिंगसह मिळतात. स्टीयरिंग व्हीलवरील लेदर कव्हर आणि विशेष ट्रिम स्ट्रिप्स देखील कारच्या स्पोर्टी फीलमध्ये भर घालतात.
फीचर्स
BMW Live Cockpit Professional ला BMW ऑपरेटिंग सिस्टम 7.0 आणि 3D नेव्हिगेशन, 12.3-इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, 12.3-इंचाचा कंट्रोल डिस्प्ले आणि BMW वर्च्युअल असिस्टंट मिळतो. इतर फीचर्समध्ये वायरलेस चार्जिंग, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, वूफरसह 16-स्पीकर सिस्टम आणि BMW डिस्प्ले यांचा समावेश आहे.