Triumph bonneville stealth edition : Triumph bonneville stealth edition लॉंच; बाईक्सची किंमत ऐकून भुवया उंचावतील!
प्रीमियम बाइक कंपनी ट्रायम्फने इंडिया बाइक वीक (IBW) 2023 मध्ये आपल्या बोनव्हिल स्टेल्थ एडिशन बाईक्स लाँच केल्या आहेत.
![Triumph bonneville stealth edition : Triumph bonneville stealth edition लॉंच; बाईक्सची किंमत ऐकून भुवया उंचावतील! Auto News triumph bonneville stealth edition launched in india price check details here Triumph bonneville stealth edition : Triumph bonneville stealth edition लॉंच; बाईक्सची किंमत ऐकून भुवया उंचावतील!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/636add7711d84514ebc5f571da7bb8881702102883500442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Triumph Bonneville Stealth Edition : प्रीमियम बाइक (Premium Bike In India) कंपनी (Triumph Bonneville Stealth ) ट्रायम्फने इंडिया बाइक वीक (IBW) 2023 मध्ये आपल्या बोनव्हिल स्टेल्थ एडिशन बाईक्स लाँच केल्या आहेत. ब्रिटीश मोटारसायकल उत्पादक कंपनीने यापूर्वीच ब्रिटनमध्ये स्टेल्थ एडिशन मॉडेल्स लाँच केले असून आता ते भारतातदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय बाईक प्रेमींना आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
ट्रायम्फ स्टेल्थ एडिशन रेंजमध्ये बॉबर पर्पल स्टेल्थ एडिशन, स्पीडमास्टर रेड स्टेल्थ एडिशन, बोनव्हिल टी 100 ब्लू स्टेल्थ एडिशन आणि बोनव्हिल T120 ब्लू स्टेल्थ एडिशनचा समावेश आहे. यासोबतच स्पीड ट्विन 900 ग्रीन स्टेल्थ एडिशन, स्पीड ट्विन 1200 रेड स्टेल्थ एडिशन, स्क्रॅम्बलर 900 ऑरेंज स्टेल्थ एडिशन आणि मॅट सिल्व्हर फिनिशसह T 120 ब्लॅक स्टेल्थ एडिशनही लाँच करण्यात आले.
ट्रायम्फ टायगर 900 जीटी
ट्रायम्फने 2023 इंडिया बाइक वीक 2023 मध्ये आपल्या 2024 टायगर 900 जीटी आणि टायगर 900 रॅली प्रो अॅडव्हेंचर टूरर्सचे लॉंच केले. या दोन्ही बाइक्समध्ये आता अपडेटेड 888 सीसी, इन-लाइन थ्री-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे आता 9,500 आरपीएमवर 107 बीएचपीपॉवर आणि 6,850 आरपीएमवर 90 एनएमपीक टॉर्क जनरेट करते. म्हणजेच बाईकची कमाल पॉवर आणि टॉर्क 12 बीएचपी वाढला आहे आणि इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. टायगर 900 जीटीची सुरुवातीची किंमत 13.95 लाख रुपये आणि टायगर 900 रॅली प्रोची एक्स-शोरूम किंमत 15.95 लाख रुपये असू शकते.
Kawasaki W175 Street लॉंच
गोव्यात सुरू असलेल्या इंडिया बाइक वीक 2023 मध्ये Kawasaki ने आपली डब्ल्यू 175 स्ट्रीट रेट्रो स्टाईल बाईक लाँच केली. ज्याची सुरुवातीची किंमत एक्स-शोरूम 1.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन कावासाकी डब्ल्यू 175 स्ट्रीटमध्ये काही व्हिज्युअल बदलांसह नवीन रंगांचा पर्याय देण्यात आला आहे. या मेड इन इंडिया बाईकची डिलिव्हरी डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या बाईकमध्ये 177 CC सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड, फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे, जे 7000 आरपीएमवर 12.5 एचपीची पॉवर आणि 6000 आरपीएमवर 13.2 एनएमचा कमाल टॉर्क जनरेट करते. ज्यात 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)