Tata Harrier and Safari In B-NCAP : Tata Harrier आणि Safari कारला B-NCAP कडून 5 स्टार रेटिंग; SUV मध्ये स्पेशल सेफ्टी फिचर्स आहेत तरी काय? B-NCAP म्हणजे काय? सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर!
टाटा मोटर्सच्या फ्लॅगशिप एसयूव्ही, नवीन सफारी आणि हॅरियर या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat- NCAP) कडून 5 स्टार रेटिंग मिळविणाऱ्या पहिल्या कार ठरल्या आहेत.
Tata Harrier and Safari In B-NCAP: टाटा मोटर्सच्या (Car) फ्लॅगशिप एसयूव्ही, नवीन सफारी आणि हॅरियर या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat- NCAP) कडून 5 स्टार रेटिंग मिळविणाऱ्या पहिल्या कार ठरल्या आहेत. अडल्ट आणि चाईल्ड प्रोटेक्शन पाहून आणि संपूर्ण सुरक्षा पाहून ही रेटिंग्ज देण्यात आली आहे. टाटा मोटर्सच्या गाड्या दणकट आणि सुरक्षेसाठी ओळखल्या जातात. Bharat- NCAP क्रॅश टेस्ट 15 डिसेंबरपासून लागू झाली आहे. नवीन क्रॅश टेस्ट सर्टिफिकेशन अंतर्गत चाचणी घेण्यात येणारी टाटा एसयूव्ही ही पहिली कार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. वाहन सुरक्षेसाठी भारताकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. Bharat- NCAP चं मंत्री नितीन गडकरींनी कौतुक केलं आहे आणि टाटा मोर्चा यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केल आहे. यापूर्वी, दोन्ही मॉडेल्स जीएनसीएपी (Global NCAP ) सुरक्षा चाचणीअंतर्गत चाचणी केली जाणारी सर्वोच्च रेटिंग एसयूव्ही बनली होती. आता, भारताच्या नवीन Bharaty NCAP प्रोटोकॉलअंतर्गत, फ्लॅगशिप टाटा एसयूव्हीला 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. सफारीची किंमत 16.19 लाख पासून सुरु आहे तर हॅरियरची किंमत 15.49 लाख पासून सुरु आहे.
नवीन सफारी आणि हॅरियर अनेक सेफ्टी फिचर्स
-7 एअरबॅग्ज, सर्व मॉडेल्समध्ये 6 स्टँडर्ड
-Standard Electronic Stability Control
-3 पॉईंट सीटबेल्ट
-सीट बेल्ट रिमाइंडर
-आयसोफिक्स टेथर्स
-रिट्रॅक्टर, प्रीटेन्शनर, लोड लिमिटर (आरपीएलएल) आणि अँकर प्रीटेन्शनर सह सीटबेल्ट आहेत.
-क्रॅश परफॉर्मन्स आणि साइड पोल इम्पॅक्ट प्रोटेक्शनसाठी एक केबिन स्ट्रक्चर देण्यात आलं आहे.
टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टेडमध्ये अपडेटेड फीचर्स ही देण्यात आलेली आहेत. ज्यात 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, टच-आधारित सेंट्रल कंट्रोल पॅनल, नवीन मूड लाइटिंग सिस्टम, वायरलेस चार्जर यासह अनेक स्टँडर्ड फीचर्स देण्यात आलेली आहेत. टाटा सफारी आणि टाटा हॅरियरमध्ये 2.0-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 170 पीएस पॉवर आणि 350 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे
Bharat- NCAP काय आहे?
भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम हा Bharat- NCAP म्हणून ओळखला जातो. या मार्फत भारतात कार रेटिंग दिली जाते. नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँड आर अँड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या आराखड्यानुसार टप्प्याटप्यात या प्रोग्रामची अंमलबजावणी केली जाणार आहे. ही जगातील दहावी एनसीएपी असून भारत सरकारतर्फे याची स्थापना करण्यात येत आहे. यात अडल्ट आणि चाईल्ड शिवाय बाकी सुरक्षिततेची चाचणी केली जाते आणि त्यानंतर रेटिंग ठरवण्यात येते.
New Car Assessment Program चाचणी कशी केली जाते?
Bharat- NCAP हे ग्लोबल टेस्टिंग प्रोटोकॉल पाळतात आणि चाचणी केलेल्या वाहनांना स्टार रेटिंग सिस्टमअंतर्गत 1 ते 5 पर्यंत रेटींग्ज दिले जातात. एडल्ट ऑक्यूपीयर प्रोटेक्शन (एओपी), चाइल्ड ऑक्यूपीयर प्रोटेक्शन (सीओपी), और सेफ्टी एसिस्ट टेक्नोलॉजीज हे तीन निकष महत्वाचे असतात. या संपूर्ण प्रक्रियेत फ्रंटल इम्पॅक्ट टेस्ट, साइड इम्पॅक्ट टेस्ट आणि साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट अशा तीन वेगवेगळ्या चाचण्यांचा समावेश आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात Bharat- NCAP हे महत्वाचं पाऊल
ऑटोमोबाईल क्षेत्रात Bharat- NCAP हे महत्वाचं पाऊल आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारची सुरक्षा आणि इतर बाबी पाहूनच Bharat- NCAP रेटिंग दिलं जात आहे. आता ज्या प्रकारे ग्राहन कारचे फिचर्स, रंग आणि इतर महत्वाच्या गोष्टी पाहून कार खरेदी करतात मात्र येत्या काळात Bharat- NCAP चं रेटिंग पाहून या कार ग्राहक खरेदी करतील म्हणजेच देशात सुरक्षित वाहनांना वाढती पसंती वाढेल. टाटाच्या दोन कारला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे एमडी शैलेश चंद्रा यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
5 Safest Cars in 2023 : 'या' भारतातील 5 सर्वात सुरक्षित कार; तुम्ही कोणती कार खरेदी कराल?