Tata Curvv Launching : टाटा लवकरच नवी कार Curve लाँच करणार; नेक्सॉनच्या किमतीपेक्षा जास्त असू शकते किंमत; फिचर्स नेमके कोणते असतील?
Tata Curvv Launching : टाटा मोटर्स ऑटो सेगमेंटमध्ये मोठा धमाका करणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये कंपनीची कूप डिझाइन केलेली एसयूव्ही टाटा कर्व्ह सादर करण्यात आली आहे.
Tata Curvv Launching : टाटा मोटर्स ऑटो सेगमेंटमध्ये मोठा धमाका (Auto News) करणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये कंपनीची कूप डिझाइन केलेली (TATA Moters) एसयूव्ही टाटा कर्व्ह सादर करण्यात आली आहे. ही कर्व्ह कार डिझेल इंजिनसह येते. मात्र, ईव्ही पॉवरट्रेन आणि पेट्रोल इंजिनसोबत ही कार बाजारात आणली जाणार आहे. कंपनी यात नवीन टर्बो पेट्रोल इंजिन आणणार आहे. याचे इंजिन नेक्सनपेक्षा चांगले असेल. कंपनीच्या टाटा कर्व्हची बऱ्याच काळापासून कार प्रेमी वाट बघत होते, अखेर ही कार आता लॉंचिंगसाठी तयार झाली आहे.
कर्व्ड डिझेलमध्ये 1500 सीसीचे इंजिन असेल
मिळालेल्या माहितीनुसार, कर्व्ह डिझेलमध्ये 1500 सीसीचे इंजिन दिले जाणार आहे. यात मॅन्युअल गिअरबॉक्सही असणार आहे. सर्वप्रथम कर्व्ह ईव्ही बाजारात आणली जाणार आहे. त्यानंतर डिझेल आणि पेट्रोल मॉडेलही बाजारात येणार आहे. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, टाटा नेक्सॉन आणि हॅरियर च्या मध्ये ही कार ठेवली जाऊ शकते. नेक्सॉन डिझेलची किंमत 11 लाख रुपये आणि हॅरियरची किंमत 15.4 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे कर्व्ह डिझेल 13 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेक्सॉन ईव्हीला मिळणार चांगली बॅटरी
नेक्सॉन ईव्हीची सुरुवातीची किंमत 14.7 लाख रुपये आहे. मात्र, कर्व्ह मोठ्या बॅटरीसह येणार आहे. कर्व्ड एसयूव्ही इलेक्ट्रिक मॉडेलला 500किमीपेक्षा जास्त रेंज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची किंमत 17 ते 22 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. पेट्रोल सर्वात स्वस्त होणार आहे. कूप स्टाईलची ही एसयूव्ही 10 ते 11 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केली जाऊ शकते. त्याच्या स्पर्धेत येणाऱ्या सर्व एसयूव्हीची सुरुवात जवळपास याच किंमतीपासून होते. येत्या काही महिन्यांत तो बाजारात लाँच केली जाऊ शकते.
टाटा कर्व्ह ही गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलसारखीच आहे. यात अपडेटेड हॅरियर आणि सफारी एसयूव्हीप्रमाणे स्पेशल ग्रिल, फ्रंट बंपर, हेडलॅम्प क्लस्टर आणि फॉग लॅम्प असेंबलीचा समावेश आहे. टर्न सिग्नल, स्क्वेअर व्हील कमानी, पिनसर स्टाईलड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि बॉडी क्लेडिंगचा समावेश आहे. ही विंडो क्रोमपासून बनवण्यात आली आहे. फ्लश प्रकारचे डोअर हँडल देणारे कर्व्ह हे पहिले टाटा मॉडेल आहे. स्लॉप छप्पर असलेली रिअर प्रोफाइल खूपच आकर्षक आहे. एसयूव्हीच्या मागील बाजूस क्लीन बंपर, फुल वाइड एलईडी लाइट स्ट्रिप, बंपर-इंटिग्रेटेड टेललॅम्प आणि स्प्लिट एरो रियर स्पॉइलर आहे.
इतर महत्वाची बातमी-